Share

राज्य मंत्रीमंडळातील मंत्र्यांकडून मराठा समाजाची चेष्टा, परिणाम वाईट होतील; आंदोलकांचा इशारा

Published On: 

जालना : अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथील मराठा आरक्षण आंदोलन ३८ व्या दिवशी देखील सुरूच आहे. राज्य मंत्रीमंडळातील मंत्री मराठा समाजाची चेष्टा करत असून त्याचे परिणाम वाईट होतील असा इशारा गुरुवारी साष्टपिंपळगाव येथील आंदोलकांनी दिला आहे. आंदोलनाचा उद्रेक होण्यापूर्वी राज्य शासनाने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या ३८ दिवसांपासून साष्टपिंपळगाव येथे ठिय्या आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी भेट दिली होती. त्यावेळी आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवदन त्यांच्याकडे सुपुर्द केले होते. मात्र, त्यानंतर शासनाकडून आंदोलकांना कोणताही निर्णय सांगण्यात आला नाही. ही आंदोलकांची फसवणूक असून यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबात समाजात गैरसमज निर्माण होत आहेत, असे आंदोलकांनी म्हटले आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी येत्या ७ मार्च रोजी साष्टपिंपळगाव येथे राज्यव्यापी आक्रोश मोर्चा होणार आहे. या मोर्चासाठी राज्यभरातून लाखो मराठा आंदोलक साष्टपिंपळगावात दाखल होणार आहे. या जनआक्रोश मेळाव्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!