Share

परभणी जिल्हा बँकेची निवडणूक नियोजित वेळापत्रकानुसारच होणार; शासन आदेशाचा परिणाम नाही

Published On: 

परभणी : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सहकार क्षेत्रातील निवडणुका ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, परभणी येथील जिल्हा सरकारी बँकेची निवडणूक नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली आहे. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम न्यायालयाचे आदेशानुसार जाहीर झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाचा आदेश या निवडणूक प्रक्रियेला लागू होत नाही, असे उपनिबंधक सुरवसे यांनी सांगितले.

दरम्यान, परभणी जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून २१ संचालक मंडळासाठी उमेदवारी अर्ज मागवण्यात आले. दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रातून १६ अर्ज अवैध ठरले, तर ८५ अर्ज वैध ठरले आहेत. १० मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे आता विरोधकांचे अर्ज मागे घेण्यासाठी दिग्गजांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्राथमिक कृषी पतपुरवठा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि धान्य अधिकोष संस्था मतदार संघात जिंतूर तालुक्यातून माजी आमदार रामप्रसाद बोर्डिकर आणि पाथरी तालुक्यातून आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. या दोन्ही तालुक्यात रामप्रसाद बोर्डीकर आणि बाबाजानी दुर्राणी हे दोघे आधीच बिनविरोध निवडून येण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे आता ८५ पैकी किती उमेदवार अर्ज मागे घेतात याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

२१ मार्च रोजी निवडणूक, १३ मार्ज रोजी मतमोजणी
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी १५४ अर्ज दाखल झाल्याने चांगली चुरस निर्माण होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. १० मार्चपर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर १२ मार्ज रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येईल. २१ मार्च रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून १३ मार्ज रोजी मतमोजणी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!