Share

बीड बायपास रोडवर विविध अपघातात दोघांचा मृत्यू

Published On: 

औरंगाबाद : बीड बायपासवर अपघाताची मालिका थांबता थाबत नाही आहे. हा रस्ता मृत्यूचा सापळाच झाला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बीड बायपास रोडवर झालेल्या विविध अपघातात जखमी झालेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

विशाल विलास भिंगारे (वय 22, रा. तारांगण नगर बीड बायपास )हा तरुण 22 फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास बीड बायपास रोडवरील झेंडा चौकातून जात असताना त्याला भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने धडक दिली होती. गंभीर जखमी झालेल्या विशाल भिंगारे याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद चिकलठाणा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

दुसऱ्या घटनेत राजेभाऊ बाबासाहेब साठे (वय 54, रा. माऊली नगर परभणी, ह. मु. अरुणोदय कॉलनी बीड बायपास ) हे बुधवारी दुपारी बीड बायपास रोड देवळाई चौकातून जालन्याकडे जात होते. बीड बायपास रोडवरील सुर्या लॉन्स समोर साठे यांना भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने धडक दिली. अपघातात जखमी झालेल्या राजेभाऊ साठे यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद पुंडलिक नगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!