Share

सोप्या शब्दात जाणून घ्या सोशल मिडिया बाबत काय आहेत नव्या गाईडलाईन्स ?

Published On: 

नवी दिल्ली: केंद्र सरकार देशात डिजिटल मीडियासाठी नियमन करणारे कायदे आणत आहे आणि येत्या तीन महिन्यांत हे कायदे लागू करणार आहेत. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी गुरुवारी याची घोषणा केली. प्रसाद आणि सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की सोशल मीडिया कंपन्यांसाठीही योग्य यंत्रणा असायला हवी. रविशंकर प्रसाद म्हणाले की, ‘सोशल मीडियाने भारतात व्यवसाय करावा, परंतु दुहेरी मानके चालणार नाहीत’.

रविशंकर प्रसाद म्हणाले की, ‘सर्वोच्च न्यायालयाने फेक न्यूज आणि सोशल मीडियाबद्दल गाइड लाइन बनवायला सांगितली आहे. संसदेतही याबाबत प्रश्न उपस्थित केले गेले असून चिंता देखील व्यक्त केली गेली आहे.गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाबद्दल बऱ्याच तक्रारी येत असून आजकाल गुन्हेगारही त्याचा वापर करत आहेत असं समोर आले आहे. त्यासाठी एक योग्य यंत्रणा असणे आवश्यक आहे.

काय आहेत नव्या गाईडलाईन्स ?
ओटीटी प्लेटफॉर्मसाठी तीन स्तरीय व्यवस्था, सेल्फ रेग्युलेशन तयार केले जाणार.भारतात चीफ कम्प्लायन्स ऑफिसर, नोडल कॉन्टॅक्ट पर्सन आणि रेसिडेंट ग्रीव्हन्स ऑफिसरची नियुक्ती करावी लागेल.जर युजर्सच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचवणारा मजकूर असेल, विशेषत: महिलांच्या, उदा. आक्षेपार्ह छायाचित्रे, असा मजकूर तक्रार दाखल झाल्यापासून २४ तासांत तो काढून टाकावा लागेल.

ओटीटी आणि डिजिटल मीडियासाठी नोंदणी आणि अस्वीकरण माहिती अनिवार्य असेल. सोशल मिडीयावरील पोस्ट हटविण्यासाठी यूजर ला सूचना द्यावी लागेल. तसेच कारण देखील सांगावे लागणार.सोशल मीडिया आणि पोर्टल्सला देखील मीडिया प्रमाणे नियमांच पालन करावे लागेल.इलेक्ट्रॉनिक माध्यमांप्रमाणेच डिजिटल प्लॅटफॉर्म्सला देखील चुकांबद्दल माफी मागावी लागेल.

सोशल मीडियासाठी नियम तीन महिन्यात नवे नियम लागू होतील.आक्षेपार्ह मजकूर सर्वात आधी कुणी सोशल मीडियावर टाकला ते सांगावं लागेल. जर तो मजकूर भारताबाहेरून आला असेल, तर तो भारतात पहिल्यांदा कुणी टाकला, हे सांगावं लागणार. २४ तासात ही आक्षेपार्ह पोस्ट हटवावी लागेल. यूजर्स चे अकाउंट वेरिफिकेशन करण्यासाठी काही नियम असावेत.युजर्सचं व्हेरिफिकेशन कोणत्या मार्गाने केलं गेलं, त्याची माहिती द्यावी लागेल.

प्रत्येक महिन्यात तक्रार, कारवाई वर रिपोर्ट द्यावा तसेच पोस्ट करणाऱ्याची माहिती द्यावी लागेल.महिन्याभरात किती तक्रारी आल्या आणि त्याच्यावर काय कारवाई केली.तक्रार निवारण व्यासपीठ आणि अधिकाऱ्याची नेमणूक करावी लागेल. तो तक्रार २४ तासांत नोंद करून घेईल आणि १५ दिवसांत तिचं निवारण करेल.जर कुठल्या युजरचा डेटा किंवा ट्वीट किंवा मजकूर हटवला गेला, तर तुम्हाला युजरला सांगावं लागेल आणि त्याची सुनावणी करावी लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!