अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या जोडीने 3 बाद 99 धावांपासून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. या जोडीकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा होती परंतु राहणे अवघ्या सात धावातच तंबूत परतला.
३८ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रहाणे बाद झाला. यानंतर, अर्धशतकी खेळी करून भारतीय संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करणारा रोहित शर्मा देखील लगेचच माघारी परतला. त्याने ९६ चेंडूत ६६ धावा काढल्या. आजच्या दिवसाची सुरुवातच भारतीय संघाची एका मागे एक धक्क्याने झाली आहे. विकेट्सचं सत्र सुरूच असल्याचं दिसून येत आहे.
रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर मग अक्षर पटेल यांना संघासाठी चांगली धावसंख्या उभारता आली नाही. रिषभ पंत ८ चेंडूत १ धावांवर बाद झाला तर, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेलला खातं न उघडातच माघारी परतावं लागलं. सद्या, आर अश्विन व इशांत शर्मा हे फलंदाजी करत आहेत. १३४ धावांवर ८ बाद अशी भारताची स्थिती असून १९ धावांची आघाडी भारताने घेतली आहे. (ही धावसंख्या ४९ षटकापर्यंतची आहे)
महत्त्वाच्या बातम्या
- सामाजिक बांधिलकी! धनंजय मुंडेंकडून ‘त्या’ चिमुकलीचा पहिला वाढदिवस साजरा
- मंगलाष्टके नव्हे तर ‘वंदे मातरम्’च्या सुरात जुळल्या अनाथांच्या रेशीमगाठी
- ‘आ.संदिप क्षीरसागरांनी काकांच्या कामाचे श्रेय लाटले’
- जिल्हा मध्यवर्ती बँकासह सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर
- बीडमध्ये दहावी, बारावी वगळता सर्व शाळा बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
