Share

गॅस, रेशनचा काळा बाजार करणारी टोळी गजाआड

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील करजखेडा येथे स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी छापा टाकला. यात गॅस व रेशनचा तांदुळाचा काळा बाजार करणारी टोळी त्यांच्या हाती लागली आहे. टोळी कडून ५ लाख ६१ हजार ६५० रुपये किमतीच्या ११५ गॅस टाक्या, तसेच ९१५० किलो तांदुळ आढळून आला . यात चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिशोर पोलीस ठाण्यांतर्गत करंजखेडा गावात आरोपी सुभाष तेजराव गवारे, कलीम खा आयुब खा पठाण, बिस्मिल्ला गुलाम शेख, कडूबा माणिकराव वाघ हे त्यांच्या दुकानात विना परवाना बेकायदेशीर घरघुती वापराचा गॅस सिलेंडर चढ्या भावाने विक्री करतात. अशी माहिती  मिळाल्यावर  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक फुंदे यांच्या पथकाने करंजखेडा येथील बस स्थानकाजवळ सुभाष तेजराव गवारे(३२) याच्या दुकानावर छापा मारला. दुकानाच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या रूम मध्ये इंडियन कंपनीचे गॅस भरलेल्या चार टाक्या, सतरा रिकाम्या टाक्या, भारत गॅस कंपनीचे भरलेली व रिकामी अशी एक टाकी असा मुद्देमाल मिळाला.

कलीम खा पठाण याच्या दुकानावर छापा मारला नंतर त्यांच्या दुकानातून इंडियन गॅसच्या भरलेल्या बावीस टाक्या, रिकाम्या सात टाक्या, भारत गॅसचे भरलेल्या चार टाक्या, रिकाम्या दोन टाक्या, एच पि गॅसचे भरलेल्या वीस टाक्या, रिकाम्या चौदा टाक्या तर इंडियन व्यावसायिक भरलेले तीन सिलेंडर,रिकामी एक टाकी, असा एकूण १,९२,६००/- किमतीचा मुद्देमाल आढळून आला.

कडूबा माणिकराव वाघ(५५) याच्या कडे भारत गॅसचे भरलेल्या सहा टाक्या, रिकाम्या तीन टाक्या असा २३१००/-रुपयेचा मुद्देमाल आढळून आला. तसेच बिस्मिल्ला गुलाम शेख याच्याकडे एच पि कंपनीचे भरलेल्या दोन टाक्या, रिकामी एक टाकी, भारत गॅसची रिकामे एक, इंडियन कंपनीची गॅस भरलेल्या पाच टाक्या, रिकामी एक असा २२,२०० चा मुद्देमाल आढळून आला.

तर यातील आणखीन एक आरोपी कालीम खा अय्युब खा याच्या करंजखेडा- चिंचोली रस्त्यावरील गोदामात रेशनचा तांदूळ व गहू ठेवला असल्याची माहिती मिळाली होती या ठिकाणी छापा टाकला असता स्वस्त धान्य वितरित होणाऱ्या तांदळाच्या लहान मोठ्या वेगवेगळ्या वजनाच्या १३९ गोण्या (९१.५०किलो) वजनाचे रेशनचा तांदूळ त्यांची किंमत २७४५००/- बेकायदेशीररित्या व चढ्या भावाने काळ्या बाजारात विक्री करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाळगला असा एकूण ११५ गॅस सिलेंडर आढळून आले असून नमूद आरोपींना गुन्ह्याच्या तपास कामी पिशोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या चार ही आरोपी विरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम व स्फोटक पदार्थ अधिनियम कायद्याअंतर्गत पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास कन्नड शहराचे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे हे करीत आहे .

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!