Share

…परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की ‘मी मर्द आहे’ – निलेश राणे

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना नेते व वनमंत्री संजय राठोड यांचा देखील पूजा चव्हाणच्या मृत्यूशी संबंध असल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपने केला आहे. यासंदर्भात काही कथित कॉल रेकॉर्डिंग्स देखील समोर आले आहेत.

दरम्यान, दोन आठवडे संजय राठोड हे नॉट रिचेबल होते. यानंतर, दोन दिवसांपूर्वी त्यांनी पोहरादेवी गडावर जाऊन संत सेवालाल महाराज व देवीचं दर्शन घेतलं होतं. यावेळी संजय राठोड यांच्या हजारो समर्थकांनी गर्दी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आल्याचे सांगत मास्क व सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करावे असं आवाहन केलं होतं.

मात्र, त्यांच्याच सरकारमधील मंत्री व त्यांच्याच पक्षाच्या नेत्याने मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवल्याचे दिसून आले होते. यानंतर, संजय राठोड यांच्यावर विरोधी पक्षांसह सत्तेशल मित्रपक्ष व शिवसेनेतील काही नेते देखील नाराज असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, काल संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी उद्धव ठाकरे त्यांचा राजीनामा घेतील अशी शक्यता होती, मात्र या भेटीचं काय झालं हे मात्र उघड झालेलं नाही.

यावरूनच भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत विखारी भाषेत टीका केली आहे. ‘ठाकरे सरकार संजय राठोडला वाचवतय. सगळ्या बाजूने अडकलेला संजय राठोड शक्तिप्रदर्शन करतो, कॅबिनेट मीटिंगमध्ये बसतो पण तरीही त्याचा राजीनामा घेण्याची हिंमत आणि धाडस मुख्यमंत्र्यामध्ये नाही… परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की ‘मी मर्द आहे’,’ असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!