🕒 1 min read
नवी दिल्ली: केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोशल मीडिया आणि ओवर-द-टॉप (ओटीटी) प्लेटफॉर्म साठी नियमावली जारी केली आहे. यावेळी या पत्रकार परिषदेत त्यांनी ज्याप्रमाणे चित्रपटांतील कंटेंट वर नियंत्रण ठेवणारे मंडळ आहे. तसे ओटीटी प्लेटफॉर्म साठी नाही. यावर देखील नियंत्रण असावे असे मत व्यक्त केल आहे.
यासठी आता नवीन नियमावली जारी करण्यात आली असून यामध्ये फेसबुक, ट्विटर सारखे सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स आणि नेटफ्लिकस, अमेजन प्राइम, हॉटस्टार सारखे ओटीटी प्लेटफॉर्म्स येतील.
त्याच बरोबर त्यांनी यावेळी सांगितलं कि, सोशल मीडिया प्लेटफॉर्म्सनि भारतात व्यापार करावा त्याचं स्वागत आहे. मात्र हे देखील खरे आहे की, सोशल मीडिया वर अश्लीलता पसरवली जात आहे. या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांना नवीन नियमावली जरी करण्यात आली आहे.
– डिजिटल प्लेटफॉर्म ला नियमांच पालन करावे लागेल.
– ओटीटी प्लेटफॉर्मसाठी तीन स्तरीय व्यवस्था, सेल्फ रेग्युलेशन तयार केले जाणार.
-ओटीटी आणि डिजिटल मीडियासाठी नोंदणी आणि अस्वीकरण माहिती अनिवार्य असेल
-पोस्ट हटविण्यासाठी यूजर ला सूचना द्यावी लागेल. तसेच कारण देखील सांगावे लागणार
-सोशल मीडिया ला देखील मीडिया प्रमाणे नियमांच पालन करावे लागेल.
– सोशल मीडिया साठी नियम तीन महिन्यात लागू होतील.
-यूजर्स चे अकाउंट वेरिफिकेशन करण्यासाठी नियम असावा
– प्रत्येक महिन्यात तक्रार, कारवाई वर रिपोर्ट द्यावा तसेच पोस्ट करणाऱ्याची माहिती द्यावी लागेल. तर २४ तासात ही आक्षेपार्ह पोस्ट हटवावी लागेल. यासरख्या अनेक नियमांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सामाजिक बांधिलकी! धनंजय मुंडेंकडून ‘त्या’ चिमुकलीचा पहिला वाढदिवस साजरा
- मंगलाष्टके नव्हे तर ‘वंदे मातरम्’च्या सुरात जुळल्या अनाथांच्या रेशीमगाठी
- ‘आ.संदिप क्षीरसागरांनी काकांच्या कामाचे श्रेय लाटले’
- जिल्हा मध्यवर्ती बँकासह सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर
- बीडमध्ये दहावी, बारावी वगळता सर्व शाळा बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
