🕒 1 min read
मुंबई : सध्या बाजारात कार्स च्या नवनवीन व्हर्जन येत आहेत. यामध्ये आता टाटा मोटर्सने टियागो लिमिटेड एडिशन कार सादर केली आहे. हे लिमिटेड एडिशन मॉडल डेटोना ग्रे रंगात पाहायला मिळू शकतं. याशिवाय गाडी दोन रंगांमध्ये सादर केली जाऊ शकते. गेल्या महिन्यात 5.79 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) या प्राईस टॅगसह सादर केली होती. ही हॅचबॅक कार आता टाटाच्या डीलरशिप्सकडे दिसू लागली आहे.
ज्यामध्ये फ्लेम रेड आणि पर्लसेंट व्हाईट या रंगांचा समावेश आहे. लिमिटेड एडिशन टियॅगोमध्ये 14 इंचांचे एलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. रेग्युलर ट्रिमशिवाय Tiago लिमिटेड एडिशनमध्ये रियर पार्सल ट्रे आणि वॉईस कमांड सिस्टिमसह पाच इंचांची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे. अडंर द हुड गाडीत 1.2 लीटरचं रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 85 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करतं. याची मोटर 5 स्पीड मॅनुअल युनिटद्वारे जबरदस्त पॉवर देते.
टाटा टियागो 2016 मध्ये लाँच करण्यात आलेली कार आहे. लाँचिंगपासूनही टाटाच्या लाईनअपमध्ये ही एक मजबूत आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली कार आहे. कंपनीने 2020 मध्ये त्यांच्या गुजरातमधील साणंद प्लांटमधून टियागोचे 3,00,000 युनिट्स रोलआउट केले होते. ही टाटाची इम्पाक्ट डिझाईन फिलॉसफीअंतर्गत बनलेली पहिली कार होती. टियागोला ग्लोबल NCap सुरक्षा टेस्टमध्ये चार स्टार रेटिंग मिळलं आहे. या कारच्या काही वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये कार एयर बॅग, रियर पार्किंग असिस्ट आणि ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशनसह सादर करण्यात आली आहे.
नवीन टियागो लिमिटेड एडिशनच्या लाँचिंगबाबत बोलताना टाटा मोटर्सचे मार्केटिंग हेड, विवेक श्रीवत्स म्हणाले की, ;2016 मध्ये लाँच झाल्यानंतर टियागो ही कार तिच्या सेगमेंटमध्ये एक यशस्वी कार ठरली आहे. तसेच ही कार सातत्याने लोकांच्या कौतुकास पात्र ठरली आहे. आम्हाला विश्वास आहे की, टियागोच्या लिमिटेड एडिशन वेरिएंटची सुरुवात आणि आमच्या न्यू फॉरएव्हर फिलॉसफीसह आम्ही सातत्याने ग्राहकांच्या पसंतीत उतरतील असे मॉडल्स लाँच करत राहू.”
महत्त्वाच्या बातम्या
- सामाजिक बांधिलकी! धनंजय मुंडेंकडून ‘त्या’ चिमुकलीचा पहिला वाढदिवस साजरा
- मंगलाष्टके नव्हे तर ‘वंदे मातरम्’च्या सुरात जुळल्या अनाथांच्या रेशीमगाठी
- ‘आ.संदिप क्षीरसागरांनी काकांच्या कामाचे श्रेय लाटले’
- जिल्हा मध्यवर्ती बँकासह सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर
- बीडमध्ये दहावी, बारावी वगळता सर्व शाळा बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
