Share

जिल्हा बँक निवडणूक: अर्ज छाणणी संपली, १४८ अर्ज वैध; आता कोणाची माघार?

Published On: 

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत २१ जागांसाठी २१४ अर्ज दाखल झाले होते.अर्ज छाननी प्रक्रीयेत १४८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून ६६ जणांचे अर्ज बाद झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश बारहाते यांनी बुधवारी (दि.२४) कळवली आहे. अनेक दिग्गज उमेदवारांचे अर्ज निवडणूकीसाठी वैध ठरले असून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत किती जण अर्ज माघार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष पदासह संचालक मंडळातील २१ जागांसाठी येत्या २१ मार्च रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २१४ जणांचे अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी सकाळपासून सुरू झालेली अर्ज छाणणी प्रक्रिया बुधवारी दुपारी संपली. दाखल झालेल्या २१४ अर्जांपैकी ६६ अर्ज बाद झाले तर १४८ अर्ज वैध ठरले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या निवडणूकीसाठी फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी विधानसभा अध्यक्ष आ.हरिभाऊ बागडे, खा.डॉ.भागवत कराड, आ.सतीश चव्हाण, आ.अंबादास दानवे, आ.रमेश बोरनारे, सिल्लोडचे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार, जिल्हा बॅकेचे विद्यमान अध्यक्ष नितीन पाटील, जिल्हा परिषदेचे सभापती किशोर बलांडे, माजी नगरसेवक पुनमचंद बमणे, किरणदेवी जैस्वाल, रंगनाथ काळे, जयराम साळुंके, कृष्णा पाटील डोणगांवकर, दिलीप बनकर, जगन्नाथ जाधव, अंबादास मानकापे, बाबुराव पवार, अभिजीत देशमुख, दामोदर नवपुते, जगन्नाथ काळे, दिनेशसिंह परदेशी, एकनाथ जाधव, देवयानी पाटील डोणगांवकर, पवन डोंगरे आदी दिग्गज उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी पात्र ठरलेल्या १४८ उमेदवारापैकी किती उमेदवार माघार घेतात यावर निवडणूकीचे चित्र अवलंबून आले. जिल्हा मध्यवर्ती बॅकेसाठी १४८ जणांचे अर्ज पात्र ठरल्याने येत्या काही दिवसात घोडेबाजार तेजीत येण्याची चिन्हे दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!