पुणे : कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून भारतात सर्व काही पूर्ववत होत आहे. पण काही जण कोरोना संदर्भातील नियम पाळत नसल्यामुळे आता कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
पुणे शहरात आज नव्याने ७४३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता १ लाख ९९ हजार ६९६ इतकी झाली आहे. शहरातील ३८२ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या १ लाख ९१ हजार ३०० झाली आहे.
पुण्यात आज एकाच दिवसात ६ हजार ५१४ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता ११ लाख १४ हजार ६६८ इतकी झाली आहे. शहरात उपचार घेणाऱ्या ३ हजार ५५९ रुग्णांपैकी २०७ रुग्ण गंभीर तर ४१० रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.
पुणे महापालिका हद्दीत नव्याने ३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ४ हजार ८३७ इतकी झाली आहे. ही संपूर्ण माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून दिलेली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचे वाढते संक्रमण हे आता केंद्र सरकारचीही चिंता वाढवत आहे. त्यामुळे तिथल्या कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी आता केंद्र सरकारनं धडपड सुरू केली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाला आवरण्यासाठी केंद्रानं उच्चस्तरीय समिती तयार केली आहे. ही समिती राज्यातील कोरोना नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : संजय राठोडांच्या पाठोपाठ आता उपमुख्यमंत्री अजित पवार देखील वर्षावर दाखल
- भारतरत्नांचा अपमान करण्याचं काम भाजपा आणि मोदी सरकार करत आहे : मलिक
- इशांत शर्माची १०० व्या कसोटीत इंग्लंडला मोठा धक्का देत धडाकेबाज सुरुवात !
- शेतकऱ्यांना आता मिळणार दिवसा ८ तास वीज पुरवठा
- राज्यातील कुठलाही सरपंच हा मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त हुशार – नारायण राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
