सिंधुदुर्ग : महाविकास आघाडी सरकारची स्थापन होऊन एक वर्ष उलटून गेले आहे. ठाकरे सरकार सध्या स्थिरावले असून सर्वात जास्त आमदार निवडून आले असतानाही भाजपला मात्र, सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. दोन दशके युतीत असणाऱ्या शिवसेनेने युती तोडत मुख्यमंत्रीपद मिळवले. शिवसेनेशी जुना संघर्ष असलेले भाजप नेते व खासदार नारायण राणे यांनी आज पुन्हा एकदा महाविकास आघाडी व शिवसेनेवर तोफ डागली आहे.
‘महाविकासआघाडीचे सरकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कृपेमुळे बसलं आहे. नाहीतर असा मुख्यमंत्री कोणी केला असता? या राज्यातील कोणताही सरपंच या मुख्यमंत्र्यांपेक्षा कितीतरी हुशार आणि कायदे माहिती असलेला आहे,’ अशी विखारी टीका नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
पुढे बोलताना त्यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ पोहरादेवी येथे जमलेल्या जमवावरून देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकांना सांगतात. इतरांना 50 माणसं जमवू द्यायची नाही , मग संजय राठोडवर काय कारवाई केली. टीव्हीवरुन बोलत असताना लोकांना प्रश्न विचारतात तुम्ही काही उत्तर देत नाही. लोकं समोर नव्हते. त्यांचं कोणीही ऐकत नाही. म्हणूनच महाराष्ट्राची ही अवस्था आहे,’ असा घणाघात राणेंनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- घरबशा मुख्यमंत्र्यांनी आधी केले मग सांगितले ; भाजप नेत्याची जहरी टीका
- कोल्हापुरातील अंबाबाई आणि जोतिबा मंदिरांच्या दर्शन वेळेत बदल !
- इशांत शर्माची १०० व्या कसोटीत इंग्लंडला मोठा धक्का देत धडाकेबाज सुरुवात !
- संजय राठोड यांना आधी चपलेनं झोडपल पाहिजे : चित्रा वाघ
- महाराष्ट्रात चाललंय काय ? राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याचा शहराध्यक्षावर गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
