Share

घरबशा मुख्यमंत्र्यांनी आधी केले मग सांगितले ; भाजप नेत्याची जहरी टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काही महिन्यापासून घट झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये कशारीतीने बसवता येतील तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येईल याचे तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते अतुल भातकळकर यांनी एक ट्वीट करून मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. ‘घरबशा मुख्यमंत्र्यांनी आधी केले मग सांगितले…मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम वर भर देण्याच्या सूचना.’ अशा आशयाच ट्वीट भातकळकर यांनी केलेले आहे.

कार्यालयीन वेळांची १० ते ५ ही मानसिकता बदलण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीत बोलले होते, त्या अनुषंगाने महाराष्ट्राने पुढाकार घेऊन नवीन कार्यसंस्कृतीची सुरुवात करावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आपण या नव्या पद्धतीच्या कामाची सुरुवात करून पाहू ज्यामध्ये कामे पण संपूर्ण क्षमतेने व व्यवस्थित पार पडतील आणि कोरोनाचा धोकाही कमी राहील. अधिकारी महासंघाने यात पुढाकार घेऊन तसेच सर्वांना विश्वासात घेऊन दोन शिफ्ट्समध्ये मंत्रालयातील कार्यालयीन वेळांचे नियोजन कसे करता येईल ते पाहावे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!