दीपक पाठक/पुणे : वनमंत्री संजय राठोड काल (२३ फेब्रुवारी) वाशिममधील पोहरादेवी गडावर गेले होते. पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर नॉट रिचेबल होते. मात्र, काल ते समोर आले. यावेळी पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड समर्थकांनी तुफान गर्दी केली होती. त्यामुळे कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले होते.
त्यामुळे संजय राठोड यांच्यावर नियमभंगाची कारवाई केली जाणार का ? असा सवाल उपस्थित केला जात होता. ‘पूजा चव्हाण आत्महत्त्या प्रकरणावरून कारवाई झाली नाही. किमान कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तरी राठोड यांच्यावर कारवाई केली जावी’, अशी मागणी विरोधकांनी केली होती.पोहरादेवी येथे कोरोना प्रतिबंधासाठी घालून देण्यात आलेले निर्बंध झुगारुन गर्दी जमली होती. यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान,संजय राठोड प्रकरणाचा फटका मुख्यमंत्री आणि सरकारच्या प्रतिमेला बसत असल्याचं खासदार शरद पवार यांचं मत आहे. तसेच तपास पूर्ण होईपर्यंत वनमंत्री संजय राठोड यांनी पदापासून दूर राहावं, अशी शरद पवार यांची भूमिका असल्याची बातमी एका वृत्त वाहिनीने दिले आहे.संजय राठोड प्रकरणामुळे मुख्यमंत्री आणि सरकारची प्रतिमा मलीन होत असल्याचंही शरद पवारांचं म्हणणं आहे.
दरम्यान,आरोप शिवसेनेच्या नेत्यांवर झाले आहेत म्हणून पवार संधी साधण्याचा प्रयत्न करत असल्याचा देखील अंदाज वर्तविण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेची काळजी पवारांना आता वाटू लागल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ठाकरे सरकारच्या प्रतिमेची शरद पवारांना वाटत असेलेली काळजी हा फक्त दिखावा आहे का हा मुख्य प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.एका व्यक्तीला बंगल्यावर नेऊन मारहाण केल्याचे आरोप मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर झाले तेव्हा पवार गप्प बसले,राज्यात साधूंची जमावाकडून हत्या झाली तेव्हा पवार गप्प होते.
एका निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केली तेव्हा देखील पवार गप्प बसले होते.राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेखवर बलात्काराचे आरोप झाले आहेत यावर देखील पवारांनी सोयीस्कर मौन बाळगले आहे.मंत्री विजय वडेट्टीवार हिंदू संधुना शिव्या घालतात त्यावेळी सरकारची प्रतिमा मलीन होत नाही का असा देखील सवाल उपस्थित होत आहे.
जनता सर्व नियम पाळत असताना जयंत पाटील संवाद यात्रा काढतात आणि कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करतात त्यावेळी सरकारची प्रतिमा मलीन होत नाही का? शिवजयंतीवर राज्यात निर्बंध घालून पोवाडा गायल्यामुळे शाहिरास अटक करण्यात आली तेव्हा देखील पवार गप्प होते.वाधवान बंधू प्रकरण झालेत्यानंतर पत्रकारांना अटक केली त्यावेळी देखील पवार गप्प होते.शरजील उस्मानी याने पुणे येथे दि. 30 जानेवारी 2021 रोजी एल्गार परिषदेत समस्त हिंदू समाजाबद्दल केलेले अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्य करून गेला त्यावेळी सरकारच्या प्रतिमेचा पवारांनी विचार केला नाही.
मराठा आरक्षणाचा,धनगर आरक्षणाचा मुद्दा सरकारला मार्गी लावता आलेला नाही. टाळेबंदी काळात अभ्यासिका बंद ठेवून बार सुरु करण्यात आले त्यावेळी सरकारची प्रतिमा मलीन होत नाही का? गोरगरिबांना भरमसाठ वीजबिले पाठवून सक्तीने वसुली केली जात आहे सोबतच विजेची कनेक्शन्स कापली जात आहेत.अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला तुटपुंज्या स्वरुपात मदत केल्यावर तसेच शेतकऱ्यांच्या राज्यात आत्महत्या होत असताना मुख्यमंत्री आणि सरकारच्या प्रतिमेची काळजी पवारांना का वाटली नाही असा देखील सवाल उपस्थित होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव देण्याची मुख्यमंत्र्यांकडे केली भूषणसिंह राजे होळकरांनी मागणी
- भाजप राजकीय प्रदुषणाचा बळी पडत आहे; वरिष्ठ नेत्याचा घरचा आहेर
- दिल्ली सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह 5 राज्यांतील नागरिकांवर देखील निर्बंध
- मार्चमध्ये बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या, तब्बल ११ दिवस बँका बंद !
- विमानप्रवाशांसाठी खुशखबर! नांदेडहून जळगाव, अहमदाबादला विमानसेवा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
