नवी दिल्लीः कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवा मध्ये बँकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या काळामध्ये नागरिकांना बँकिंग सुविधा सुरळीत मिळू शकला तर केवळ बँक कर्मचाऱ्यांच्या कामामुळे. मात्र आता अनेक सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बँकांना मोठ्या प्रमाणात सलग सुट्ट्या येत आहेत. त्यामुळे देशभरातील बँक ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागणार असून मार्च एंडची कामे असतानाच आता बँकांना बर्याच सुट्ट्या मिळणार आहेत. जर आपली बँकेची काही कामे प्रलंबित असल्यास लवकरात लवकर ती उरकून घ्या. फेब्रुवारी महिना संपण्यासाठी अवघे काही शिल्लक असताना मार्चमधील सुट्ट्यांची यादी जाहिर झाली आहे.
देशातील सर्व बँकांना ही ११ दिवसांची सुट्टी राहणार आहे. फक्त वेगवेगळ्या राज्यात या सुट्ट्या वेगवेगळ्या दिवशी असतील. काही राज्यांत, स्थानिक सणांच्या आधारे बँकांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात येतील. आपल्याकडेही डिसेंबर महिन्यात बँकेशी संबंधित काही विशेष कामं असल्यास आताच बँकांच्या सुट्ट्यांबद्दल जाणून घ्या.
त्यामुळे नागरिकांनी बँकेचे काम करण्यासाठी घराबाहेर पडता कॅलेंडर पाहून बाहेर पडावे. मुंबईसह महाराष्ट्रात ९ दिवस बँकांचे काम बंद असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या हॉलिडे कॅलेंडरनुसार, मार्चमध्ये होळी आणि महाशिवरात्रीसह एकूण 11 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. यापैकी 5 मार्च, 11 मार्च, 22 मार्च, 29 मार्च आणि 30 मार्च रोजी बँकांना सुट्टी असेल. त्याशिवाय 4 रविवार आणि 2 शनिवारीही बँका बंद राहतील. म्हणजेच मार्चमध्ये एकूण 11 दिवस बँकांमध्ये काम पूर्ण बंद राहणार आहे.
मार्च 2021 मध्ये बँकांना असलेल्या सुट्ट्या 5 मार्च, शुक्रवार, फक्त मिझोरममध्ये सुट्टी, 7 मार्च, रविवार, 11 मार्च, गुरुवार, महाशिवरात्री, 13 मार्च, दुसरा शनिवार, 14 मार्च, रविवार, 21 मार्च, रविवार, 22 मार्च, सोमवार, बिहार दिन, फक्त बिहारमध्ये सुटी, 27 मार्च, चौथा शनिवार, 28 मार्च, रविवार, होळी, 29 मार्च, सोमवार, धूलिवंदन, 30 मार्च, मंगळवार, राजस्थान दिवस, यातील ७ मार्च रविवार, 11 मार्च गुरुवार महाशिवरात्री, 13 मार्च दुसरा शनिवार, 14 मार्च रविवार, 21 मार्च रविवार, 27 मार्च चौथा शनिवार, 28 मार्च रविवार होळी, 29 मार्च सोमवार धूलिवंदन अशा एकूण ९ दिवस राज्यात बँका बंद राहतील. त्यामुळे मार्चमधील कामे पटापट आटपून घ्या.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव देण्याची मुख्यमंत्र्यांकडे केली भूषणसिंह राजे होळकरांनी मागणी
- भाजप राजकीय प्रदुषणाचा बळी पडत आहे; वरिष्ठ नेत्याचा घरचा आहेर
- दिल्ली सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह 5 राज्यांतील नागरिकांवर देखील निर्बंध
- ‘पालघर साधू हत्याकांडापासून पूजा चव्हाण प्रकरणापर्यंत कडक कारवाई महाराष्ट्रातील जनता बघतेच आहे’
- विमानप्रवाशांसाठी खुशखबर! नांदेडहून जळगाव, अहमदाबादला विमानसेवा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
