Share

आगामी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: येत्या काही महिन्यात देशात ५ राज्यांच्या विधान सभा निवडणुका पार पाडणार आहेत या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून तयारी सुरु झाली असून विशेषतः पश्चिम बंगाल मध्ये मायावतींची सत्ता उलथवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, तमिळनाडू, पुद्दुचेरी, आसाम, केरळ या राज्यांच्या निवडणुका पार पडणार आहेत.

दरम्यान, आता या राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगा ची आज बैठक पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर निवडणुका पार पडणार आहेत. याआधी कोरोना काळात बिहार विधानसभेची निवडणूक यशस्वीरित्या पार पडली आहे.

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागा आहेत. बंगालमध्ये सध्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेसचं सरकार आहे. निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी याठिकाणी सुरु केली आहे. राजकीय नेत्यांच्या सभा, दौरे सुरु झाले आहेत. तृणमूल काँग्रेस दावा करत आहे की पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचं सरकार येणार आहे. तर भाजप तृणमूल काँग्रेसला सत्तेतून पायउतार करणार असल्याचं बोलत आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्या कडवी झूंज येथे पाहायला मिळणार आहे.

तमिळनाडू : तमिळनाडू विधानसभेच्या एकूण 234 जागा आहेत. मुख्यमंत्री के पलानीस्वामी यांच्या नेतृत्वात सत्ताधारी पक्ष एआयएडीएमके पाच वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळातील विकामकामांची जोरदारी जाहीरात करताना दिसत आहे. तर विरोधी पक्ष डीएमके-काँग्रेस यांची आघाडी आक्रमक दिसत आहे. विरोधी पक्ष सातत्याने एआयडीएमके सरकारवर हल्लाबोल करताना दिसत आहे. यंदाची विधानसभेची पहिली निवडणूक असेल की जी करुणानिधी आणि जे जयललिता यांच्याशिवाय पार पडणार आहे. भाजप एआयएडीएमके याच्यासोबत युती करुन तामिळनाडू निवडणूक लढवणार आहे.

पुद्दुचेरी : पुद्दुचेरी विधानसभेत एकूण 30 जागा आहेत. पुद्दुचेरीतील काँग्रेसचं सरकार अडचणीत आलं आहे. बहुमत चाचणीत मुख्यमंत्री नारायणसामी बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरलं आहेत. विधानसभेत बहुमत चाचणीच्या आधीच काँग्रेस आमदारांनी सभात्याग केला. त्यानंतर पुद्दुचेरीतील काँग्रेसचं सरकार कोसळलं. मागील काही दिवसांपूर्वी चार आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता काँग्रेस आमदार लक्ष्मीनारायण यांनीही राजीनामा दिल्यानं ही संख्या पाचवर पोहोचली होती. तसेच सहयोगी पक्ष डीएमकेच्या आमदारांनीही राजीनामा दिल्यानं नारायणसामी सरकार अल्पमतात आलं होतं.

आसाम : आसाम विधानसभेत एकूण 126 जागा आहेत. सध्या आसाममध्ये सर्बानंद सोनेवाल यांच्या नेतृत्वात भाजपचं सरकार आहे. काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत ऑल इंडिया यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट (एआययूडीएफ), सीपीआय, सीपीआयएम, सीपीआयएमएल आणि आंचलिक गण मोर्चा यांच्यासोबत आघाडी करणार आहे.

केरळ : केरळ विधानसभेत एकूण 140 जागा आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत एलडीएफने 83 जागांवर विजय मिळवला होता. यूडीएफने 47 जागा जिंकण्यात यश मिळवलं होतं. तर भाजपला एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं. भाजपने एकूण 98 जागांवर आपले उमेदवार उतरवले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!