🕒 1 min read
मुंबई : परळी येथील टिकटॉक गर्ल पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड कुठे आहेत, असा प्रश्नही विरोधक विचारत आहेत. इतके दिवस प्रसिद्धीमाध्यमांपासून दूर राहिलेले संजय राठोड आज (२३ फेब्रुवारी) पोहरादेवीचं दर्शन घेणार आहेत.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर ते जनतेसमोर कधी येतात याची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे. त्यांच्याशी संवाद व्हावा, त्यांच्यावर झालेल्या आरोपासंदर्भाने खुलासा व्हावा म्हणून माध्यमाचे प्रतिनिधी पोहरादेवी याठिकाणी डेरेदाखल आहेत.
संजय राठोड सहपरिवार पोहरादेवीत येतील. ते संत सेवालाल महाराजांचं दर्शन घेतील, संत रामराव बापू आश्रमाला भेट देतील, धर्मपीठावर जाऊन भक्तीधामला भेट देऊन निघून जातील. राठोड माध्यमांशी बोलणार की नाही याबद्दल काही सांगण्यात आलेलं नाही.
राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या पाठिशी शिवसेना पक्षही उभा असल्याचे चित्र आता समोर येत आहे. कारण, पोहरादेवीला जाण्यासाठी निघालेल्या संजय राठोड यांच्या घरी सकाळपासून शिवसेनेचा एकएक नेता दाखल होताना दिसत होता. पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड समर्थकांनी तुफान गर्दी केली असून कोरोनाच्या सगळ्या नियमांना पायदळी तुडवला आहे.
पोहरादेवीची ‘पूजा’ तरी कशी पावेल जर चव्हाणाच्या पूजाच काय झाल ते सांगितल तर नाहीत तर ?
— Keshav Upadhye (@keshavupadhye) February 23, 2021
दरम्यान, याचे राजकीय पडसाद उमटायला लागले आहेत. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यावरून संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘जर चव्हाणाच्या पूजाचं काय झाल, ते सांगितलं नाही तर पोहरादेवीची ‘पूजा’ तरी कशी पावेल’, असं केशव उपाध्ये यांनी म्हंटलंय.
महत्वाच्या बातम्या
- ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरूच्या बंजारा लूकचा सोशल मीडियावर धुमाकूळ
- खबरदार! विनामास्क ‘एसटी’त चढाल तर
- शिर्डीला जात असाल तर ही बातमी वाचाच, कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे घेतला मोठा निर्णय
- डॉक्टर असूनही औषधाचा प्रचार कसा करता ? केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना ‘आयएमए’ने फटकारले
- साहेब पिक वाया गेले, आतातरी अनुदान वाटप करा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
