Share

‘काँग्रेसमुळे वाण नाही, पण गुण लागला ; म्हणून राम मंदिराचा चंदा आठवला’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दिवसेंदिस वाढणाऱ्या दराने आता पेट्रोल शंभरी पार करण्याच्या स्थितीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांची किंमत कमी असतानाही भारतात मात्र, पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले असल्याने सर्वसामान्य प्रचंड त्रस्त झाली आहे. यावरुन विरोधक मोदी सरकारवर टीकेची झोड उठवत आहे.

काही दिवसांपूर्वी वाढत्या इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करणाऱ्या शिवसेनेने याच मुद्द्यावरून आज सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर टीका केली आहे. ‘पेट्रोलचे भाव वाचून ज्याच्या छातीत कळ येणार नाही तो शूरवीर व ज्यास घाम फुटेल तो कमकुवत मनाचा, असा जो प्रकार सध्या आपल्या देशात सुरू आहे तो खतरनाक मनोवृत्तीचा आहे.

लोकांना जगण्याचा हक्क आहे व त्यातही जीवनावश्यक गोष्टींचे भाव नियंत्रित ठेवणे हे सरकारचे कर्तव्य ठरते. केंद्रातील सरकारला आपल्या कर्तव्याचा विसर पडला असेल, तर जनतेने हा स्मृतिभ्रंश दूर करायला हवा.

राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा. त्यामुळे रामभक्तांच्या चुली पेटतील व श्रीरामही खूश होतील. लोकांनी वाहने खरेदी केली ती कामधंद्याच्या सोयीसाठी. ही सर्व वाहने रस्त्यावर सोडून एक दिवस लोकांना घरी जावे लागेल. मग बसा बोंबलत’, असं म्हणत शिवसेनेने अग्रलेखातून मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

दरम्यान, यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी भाष्य केले आहे. संजय राऊत आणि अर्थशास्त्र याचा काडीचाही संबंध नाही. संबंध असलाच तर तो टक्केवारीशी आहे. त्यामुळे त्यांना पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून राम मंदिराचा चंदा आठवला. काँग्रेसमुळे वाण नाही पण गुण मात्र लागलाय. पेट्रोल-डिझेलच्या दरात २६ रूपयांचा वॅट राज्य सरकारचा आहे. तो कमी करा. ममता बॅनर्जींचं एवढं तरी ऐका. मग त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करा, असा घणाघात भातखळकर यांनी राऊत यांच्यावर केला आहे.

मोदी जो कर जमा करतायत त्याचा ४१ टक्के तुम्हाला मिळतोय. त्यामुळे लोकांना विनाकारण भडकवायचं आणि खोटं बोलायचं हे उद्योग आता संजय राऊत यांनी बंद करावेत, असंही भातखळकर यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!