Share

पालम तालुका व ६५ गावे नळ पाणीपुरवठा योजनेला गती द्या : गुलाबराव पाटील

Published On: 

🕒 1 min read

परभणी : अनेक दिवसांपासून रखडलेल्या परभणी जिल्ह्यातील पालम तालुका व ६५ गावे नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती द्यावी असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. या योजनेचा आढावा घेण्यासाठी नुकतीच मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक पार पडली.

गुणवत्ता परिक्षण पथकाकडून पाहणीचे निर्देश
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी ६५ गाव नळ पाणीपुरवठा योजनेचे काम आणि त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व गुणवत्ता परिक्षण पथक यांनी एकत्रितपणे या योजनेस भेट देऊन त्या भेटीचा निरीक्षण अहवाल पाणी पुरवठा विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे सादर करण्याचे निर्देश गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले.

औरंगाबाद येथे बैठक आयोजित करण्याचे निर्देश
तसेच, योजनेवरील प्रत्येक उपांगाचे किती काम झाले आहे, याची पाहणी करून त्यानंतरच कंत्राटदाराविषयी योग्य तो निर्णय घेण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. पालम तालुका व 65 गावे नळपाणी पुरवठा योजनेबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद येथे बैठक आयोजित करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. यावेळी परभणीचे माजी खासदार सुरेश जाधव,पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!