🕒 1 min read
लातुर : काही दिवसापुर्वी रेल्वे मंत्रायलाने दिक्षाभुमी एक्स्प्रेसचे ही पुण्याऐवजी लातुरमार्गे सोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दिक्षाभुमी एक्स्प्रेसचे ही लातुर रेल्वे स्थानकात शुक्रवारी आली. यावेळी या रेल्वेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार, खासदारांची उपस्थिती होती.
अनेक वर्षापासून दिक्षाभूमी एक्स्प्रेसचे ही पुणे, दौंड, औरंगाबाद मार्गे जात होती. नविन मार्गानुसार या रेल्वेचे जवळपास ४७५ किमी चे अंतर आणि १०-१२ तास प्रवासाचा वेळ वाचणार आहे. ही गोष्ट दोन वर्षापुर्वी अभिमन्यू पवार आणि मध्य रेल्वे सोलापूर मंडळाच्या सल्लागार समितीचे सदस्य श्यामसुंदर मानधना यांनी लक्षात आणून दिली. त्यानंतर अभिमन्यु पवार यांच्या मागणीमुळे काही दिवसापुर्वी रेल्वे मंत्रालयाने ही रेल्वे लातूर मार्गे सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी दुपारी रेल्वेचे आगमन लातूर रेल्वे स्थानकावर झाले. यावेळी रेल्वे घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी खासदार सुधाकर शृंगारे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार कराड, माजी खासदार डॉ. सुनिल गायकवाड व इतर पदाधिकारी होते. या सर्वानी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला आणि ही रेल्वे पुढील प्रवासासाठी रवाना झाली. या रेल्वेमुळे लातूर आता उत्तर भारताशी जोडला गेला आहे. या रेल्वेमुळे कोल्हापूर, पंढरपूर, तुळजापुर, परळी वैजनाथ, वाराणशी आदी धार्मिक स्थळांना भेटी देणे शक्य होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र शासनाचा स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार ज्ञानेश्वर जाधवर यांना घरपोच प्रदान !
- दुचाकीवर बनावट क्रमांक टाकणारा ताब्यात
- पुजाला यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयातच मारलं अन् पुण्यात आणून इमारतीवरून फेकलं, नातेवाईकाचा आरोप
- औरंगाबादेत ‘थ्री इडियट’, रँचो डॉक्टर्सची भन्नाट कल्पना
- कोराना जोमात, तरीही मनपाकडून सुनिल केंद्रेकरांच्या सुचनांकडे दुर्लक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
