Share

‘उस्मानाबादसह औरंगाबादचे नामांतर करा, अन्यथा..’

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद : उस्मानाबाद आणि औरंगाबाद ही शहरे जुलमी राजवट व पारतंत्र्याची आठवण करून देणारी आहेत. त्यामुळे या शहरांची नावे बदलून धाराशिव व छत्रपती संभाजीनगर करावी अशी मागणी हिंदुराष्ट्र सेनेने केली आहे.

याबाबत वाशी तहसील प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही नावे म्हणजे इतिहासात झालेल्या जुलमी राजवटीची व गुलामीची निशाणी सांभाळून ठेवत झालेल्या अमानुष अत्याचाराची जखम भळभळत ठेवल्यासारखे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालेले असतानाही नावे कशासाठी, ती तत्काळ बदलावीत व उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे धर्मवीर छत्रपती संभाजीनगर हे नावे देऊन आपण स्वतंत्र देशात आहोत, याची प्रचिती द्यावी.

मागणीचा विचार न झाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर परीक्षित साळुंके, पवन नलवडे, प्रदीप पाटील, शिवराज जाधव, आशुतोष स्वामी, विकास क्षीरसागर यांच्यासह हिंदुराष्ट्र सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या स्वाक्षरी असून त्यांच्या वतीने वाशी येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!