🕒 1 min read
बीड : बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेवराई तालुक्यातील पांगरी येथील रहिवाशी असलेल्या एका नराधमाने आपल्या अल्पवयीन भाचीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. हा गुन्हा पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत घडला आहे. त्याचा तपास गेवराई पोलीस ठाण्याकडे सोपविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तेरा वर्षीय पीडित मुलगी आपल्या आत्याच्या घरी राहत होती. आत्याच्या नवऱ्याने पिंपळनेर येथील एका लॉजवर या मुलीवर अत्याचार केला. पीडित मुलीने हा प्रकार कुटुंबीयांनी सांगितल्यावर ही घटना समोर आली. पिंपळनेर आणि गेवराई पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी केल्यानंतर हा गुन्हा रात्री गेवराई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अत्याचारासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे.
अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार
केजमध्ये एक अत्याचाराची घटना उघड आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून १५ वर्षीय मुलीस पुणे येथे पळवून नेत एका लॉजवर तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. १८ फेब्रुवारी रोजी पीडित मुलगी आणि आरोपी केज पोलिसांत ठाण्यात हजर झाले. पीडितेच्या फिर्यादीवरून विठ्ठल रतन गायकवाड (२०, रा. आरणगाव ता. केज) या तरुणाविरुद्ध अत्याचार आणि पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
महत्वाच्या बातम्या
- रेशनचा काळाबाजार, दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल
- पोलीस ऍक्शन मोडमध्ये : …तर वनमंत्री संजय राठोड यांची पुणे पोलीस करणार चौकशी
- महाविकास आघाडी सरकारने नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत करावी-पंकजा मुंडे
- …अन्यथा लॉकडाऊनचा निर्णय शासनाला घ्यावा लागेल; भुजबळांचं सूचक विधान
- पोलीस ऍक्शन मोडमध्ये : …तर वनमंत्री संजय राठोड यांची पुणे पोलीस करणार चौकशी


