🕒 1 min read
औरंंगाबाद : बनावट मतदानकार्ड बनविणाNया दोघांचा गेल्या आठवड्यात निवडणूक विभागाने आणि पुंडलिकनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत पर्दाफाश केला होता. अटकेत असलेल्या दोघांपैकी महा-ई-सेवा वेंâद्राचा नोकर नवनाथ भक्तदास शिंदे (वय २६, रा. योगेश्वरी नगर, गारखेडा परिसर) याला १५ हजार रूपयांच्या जात मुचलक्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस.वाडकर यांनी जामीन दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभगाचे तहसीलदार शंकर लाड व पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या पथकाने गेल्या आठवड्यात १० पेâब्रुवारी रोजी रात्री संयुक्त कारवाई करीत मातोश्री डिजीटल या दुकानाचा मालक हरिश धुराजी वाघमारे (वय २२, रा. गजानन कॉलनी, गारखेडा परिसर) व महा-ई-सेवा वेंâद्राचा नोकर नवनाथ शिंदे यांना बनावट मतदानकार्ड तयार करून वितरीत करतांना अटक केली होती.
दोघांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यावर न्यायालयाने दोघांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, नवनाथ श्ािंदे याने जामीनासाठी अॅड.शिरीन वारे यांच्या मार्पâत अर्ज सादर केला होता. या अर्जावर सुनावणी झाली असता न्या.ए.एस.वाडकर यांनी १५ हजार रूपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. अॅड.शिरीन वारे यांना अॅड. संजय घागरे यांनी सहकार्य केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘जवळजवळ बाटलीबंद होत आलेले कोरोनाचे भूत पुन्हा बाहेर येते की, काय ?’
- कुमारस्वामींनंतर आता सिद्धारामैय्यांचा देखील राम मंदिराला देणगी देण्याला विरोध
- टूलकिट प्रकरणात नवनवीन नावांचा समावेश; अनिता लाल पोलिसांच्या रडारवर
- सलग नवव्या दिवशी इंधन दरवाढ कायम; सर्वसामान्य चिंतेत !
- इंग्लंड की कुटाई हो गई ! ‘या’ खेळाडूकडून टीम इंडियाच अभिनंदन !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
