Share

सोनारीचे जवान तोडकरी यांना पठाणकोट येथे वीरगती, भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार

Published On: 

उस्मानाबाद : शूरवीर सागर तोडकरी या जवानावर मंगळवारी सायंकाळी ६ वाजता परंडा तालुक्यातील सोनारी येथे भावपूर्ण वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सोनारी गावातून फुलांनी सजवलेल्या वाहनातून जवान तोडकरी यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी जवानास श्रद्धांजली वाहण्यासाठी पंचक्रोशीतील तरुणांनी व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

सोनारी येथील सागर पद्माकर तोडकरी (३०) या जवानास पंजाबमधील पठाणकोट येथे कर्तव्यावर असताना १४ फेब्रुवारी झालेल्या अपघातात वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या पश्चात आई, वडील, बहीण, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. मंगळवारी (दि.१६) पुणे येथून सोनारी येथे तोडकरी यांचे पार्थिव शासकीय वाहनातून आणण्यात आले. सोनारी गावातून फुलांनी सजवलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर विविध ठिकाणी “वीर जवान, तुझे सलाम’ लिहिलेल्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. गावातील मुख्य चौकात तरुण मोठ्या संख्येने जमा झाले होते.

जवानाच्या पार्थिवावर गावच्या शेतातील घराजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अहमदनगर येथील एमआयआरसी ट्रेनिंग सेंटरचे कॅप्टन रूपेशकुमार यांच्यासह २२ जणांनी जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने सलामी देऊन व पुष्पचक्र अर्पण करून सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, जि.प. माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील हांडोग्रीकर आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!