🕒 1 min read
चेन्नई : गेल्या दोन महिन्यांपासून जास्त काळापेक्षा दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला जगभरातून पाठींबा मिळत आहे. तर सरकारवर यारून टीका देखील केली जात आहे. यामध्ये सध्या तरुण पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने प्रसिद्ध केलेल्या टूलकीट प्रकरणी वातावरण तापले असून यामध्ये पोलिसांकडून तपास सुरु असून आता पर्यंत ७ नवे या प्रकरणात पुढे आली आहेत तर काहीना अत्क्न देखील करणायत आली आहे.
दरम्यान, शेतकरी आंदोलनामुळं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात असंतोष वाढत चालला असताना दाक्षिणात्य अभिनेत्री ओविया हेलन हिने देखील मोदींना विरोध केला आहे. तिनं ‘गो बॅक मोदी’ असं ट्विट करुन मोदींबाबत आपली नाराजी व्यक्त केली होती. अभिनयासोबतच ओविया सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती रोखठोकपणे प्रतिक्रिया देते. नुकतेच तिने नरेंद्र मोदींविरोधात ट्विट करुन खळबळ माजवली होती.
— Oviyaa (@OviyaaSweetz) February 13, 2021
ओविया ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचं पूर्ण नाव हेलेन नेल्सन असं आहे. तिनं 2007 साली ‘कांगारू’ या मल्याळम चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ‘अपुर्वा’, ‘नालाय नमधे’, ‘कालवनी’, ‘मरिना’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. दरम्यान ओवियाला खरी लोकप्रियता मिळाली ती ‘मुथुकु मुथागा’ या चित्रपटामुळं. 2011 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटानंतर तिचं नाव दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडिच्या कलाकारांमध्ये घेतलं जाऊ लागलं.
मात्र तिला हे ट्विट करणं आता तिला भारी पडू शकतं. तमिळनाडू भाजपाचे राज्य सचिव डी अ;ॅलेक्सिस सुधाकर यांनी ओवियाविरूद्ध पोलीस अधीक्षक आणि सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. ओविया हेलेन यांच्या ट्वीटमागील हेतूचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणीही भाजप नेत्याने केली आहे. खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय अजेंड्याखाली जनतेला भडकवण्यासाठी अभिनेत्रीने हे ट्वीट केल्याचा भाजपला संशय आहे. हेलेनच्या या ट्वीटनंतर बर्याच लोकांनी सार्वजानिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे, असा दावाही सुधाकरन यांनी केला आहे
महत्त्वाच्या बातम्या
- ‘जवळजवळ बाटलीबंद होत आलेले कोरोनाचे भूत पुन्हा बाहेर येते की, काय ?’
- कुमारस्वामींनंतर आता सिद्धारामैय्यांचा देखील राम मंदिराला देणगी देण्याला विरोध
- टूलकिट प्रकरणात नवनवीन नावांचा समावेश; अनिता लाल पोलिसांच्या रडारवर
- सलग नवव्या दिवशी इंधन दरवाढ कायम; सर्वसामान्य चिंतेत !
- इंग्लंड की कुटाई हो गई ! ‘या’ खेळाडूकडून टीम इंडियाच अभिनंदन !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
