Share

भाजपाने देशविरोधी केलेल्या षडयंत्राचा पर्दाफाश झाला ; सचिन सावंतांचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : केंद्र सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केलेल्या सेलिब्रिटींच्या ट्विटचा आशय सारखाच आहे. हा आशय सारखा असल्याने त्यांना कोणी हे करायला सांगितले का ? असा सवाल सामान्यांमध्ये उपस्थित झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या दबावाखाली सेलिब्रिटींनी ट्वीट केलं का? याची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती.

त्यानंतर भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सडकून टीका केली होती. यामुळेच देशमुख यांनी भूमिका बदलेली असल्याचे पाहायला मिळाले. ‘लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांना संपूर्ण देशच दैवत मानतो. मी त्यांच्या चौकशीची भाषा कधीही केली नव्हती. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मला भाजपच्या आयटी सेलची चौकशी करु, असे म्हणायचे होते, असे स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी दिले आहे.

या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी सोमवारी आपली बाजू स्पष्ट केलीये. माझा आदेश हा भाजपच्या आयटी सेलची चौकशी करण्यासाठी होता. त्यांनी काही स्क्रिप्ट दिली का? दिल्लीमध्ये आम्ही जी चौकशी केली, त्यामध्ये भाजप आयटी सेलचे प्रमुख आणि १२ इन्फ्ल्युएन्सरची नावं समोर आली आहेत. त्यांची रितसस चौकशी सुरु असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यावरून भाजपावर टीकास्त्र डागले आहे. ‘भारतीय जनता पक्षाने सेलिब्रिटींवर दबाव आणून शेतकरी आंदोलनाविरोधात ट्विट करण्यास भाग पाडले हा काँग्रेसचा आरोप सत्य होता, हे सिद्ध झाले असून पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत भाजपाच्या आयटी सेल व १२ व्यक्तींचा हात होता, हे समोर आले आहे’, असे म्हणत भाजपाने देशविरोधी केलेल्या षडयंत्राचा पर्दाफाश झाला असून भाजपा आयटी सेल व १२ जणांवर तात्काळ कारवाई करा’ अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!