Share

खाम नदीसाठी छावणीच्या सीईओंचा पुढाकार

Published On: 

औरंगाबाद : मनपा तर्फे खामनदीची स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील नागरिक तसेच मनपा यासाठी काम करीत आहे. त्यातच छावणी परिषदेचे सीईओ विक्रांत मोरे यांनी पुढाकार घेत. खाम नदी काठी शनिवारी वृक्षारोपण केले.

खाम नदी पुनर्जीवित करण्याचे काम मनपाने हाती घेतले आहे. हे काम मागील काही वर्षांपासून सुरू आहे. त्याला चालना देण्यासाठी मनपा आयुक्तांनी लोकसहभागातून काम व्हावे यासाठी नागरिकांना आवाहन देखील केले होते. त्याला काही प्रमाणात नागरिकांनी देखील प्रतिसाद दिलाय. लोकसहभागातून हे कार्य पार पडणार आहे.

शनिवारी त्याचाच भाग म्हणून खाम नदी काठी वृक्षारोपण करण्यात आले,  यावेळी छावणी परिषदेचे सीईओ विक्रांत मोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे, वाहतुक शाखेचे पोनि देशमुख, बेगमपुरा पो. ठा. निरीक्षक सानप, गरवारे बाल भवनचे संचालक सुनील सुतावणे, मिलिंद महाविद्यालयातील एनसीसीचे कॅडेट, सामाजिक संस्था, स्थानिक नागरिक, मनपा उद्यान कर्मचारी तसेच स्वच्छता कर्मचारी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. यावेळी नदी पत्रातील प्लास्टिक मोठ्या प्रमाणात काढण्यात आले असून, जेसीबीच्या साहाय्याने नदी पात्र मोकळे करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!