🕒 1 min read
मुंबई- जेजुरी गडावरील राजमाता अहिल्या देवी यांच्या पुतळ्याचे शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते अनावरण होणार होते. मात्र, अहिल्यादेवींच्या पुतळ्याला शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्टाचारी नेत्याचे हात लागता कामा नये, असे सांगत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी आजच जेजुरी गडावर जाऊन या पुतळ्याचे अनावरण केले. त्यामुळे यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.
पडळकर यांच्यानंतर आता होळकर घराण्याच्या वंशजांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. शरद पवार या सगळ्याच्या माध्यमातून राजकारण करु पाहत असल्याचा आरोप भूषणसिंहराजे होळकर यांनी केला. कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांना होळकर कुटुंबीयांनी याबाबत पत्र लिहिले असून, त्या पत्रामधून शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
जेजुरी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचा आडून बहुजन समाजात दुही माजवण्याचे राजकारण सुरू असून आज पार पडणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला छत्रपती संभाजीराजे यांनी जाऊ नये, अशी पत्राद्वारे विनंती केली आहे.बहुजन समाजात दुही माजवण्याचे राजकारण केल्याचा पवार यांच्यावर आधी देखील झाले आहेत आता होळकर यांच्या वंशजांनी देखील असाच आरोप केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याहस्ते अनावरण होणार आहे.
होळकर घराणे आणि छत्रपती घराण्याचे संबंध अनेक पिढ्यांपासूनचे आहेत. दोन्ही घराण्यांनी समाजहितासाठी काम करून लोकमान्यता मिळवली आहे. आपला पूर्ण सन्मान ठेवून आपणास एक बाब निदर्शनास आणून द्यायची आहे. जी आपल्यापासून मुद्दामहून लपवली गेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण बहुजन समाजाला एकत्र करून स्वराज्य उभारले. नंतरच्या काळात छत्रपती घराणे व होळकर घराणे यांनी सोयरिकही केल. बहुजन समाज एक होऊन राष्ट्रीयत्वाची भावना जागृत व्हावी हा त्यामागचा हेतू होता असे या पत्रात होळकर यांनी म्हटले आहे.
परंतु आता होळकर घराण्याच्या समृद्ध सामाजिक कार्याचा उपयोग करून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्या माध्यमातून होत आहे. समाजाचे अनेक प्रश्न असताना फक्त समाजामध्ये तेढ निर्माण करून आपला हेतू साध्य करणे हा त्यांचा उद्देश आहे. याचाच एक भाग म्हणून कथित विदेशी मूळचे होळकर ज्यांना येथील तत्कालिन सरकार आणि समाजाने नाकारले. आपले आजोबा श्रीमंत छत्रपती शहाजी महाराज ज्यांच्याविरोधात होते. अशा व्यक्तींच्या उपस्थितीत जेजुरी येथे कार्यक्रम घेत आहेत हा माँसाहेबांच्या कार्याचा अवमान आहे, अशी समस्त बहुजन समाजाची भावना आहे.
होळकर घराण्याच्या परंपरेवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकामध्ये त्यामुळे अस्वस्थता आहे, अशा व्यक्तींना महाराष्ट्रात जेजुरी गडावर पुतळा अनावरणाचे आमंत्रण देऊन चुकीचा संदेश देण्याचे आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचे काम शरद पवार यांच्याकडून होत आहे, याचा विचार आपणाकडून व्हायला हवा, असे संभाजी राजे यांना लिहिलेल्या या पत्रात होळकर यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांनी पेरलेल्या घाणेरड्या राजकारणाची मुळं महाराष्ट्रात रुजत असतील तर त्याचे दीर्घकालीन परिणाम हे समाजाला भोगावे लागतील. याची आपणासही जाणीव असेलच. त्याऐवजी एखाद्या शहीद जवानाची वीरमाता किंवा पत्नी, शेतकरी, मेंढपाळ यांनी हे अनावरण केले असते तर तो माँसाहेबांच्या कार्याचा गौरव ठरला असता असे या या पत्रात होळकर यांनी म्हटले आहे.
जेजुरी गडावर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे शनिवारी शरद पवारांच्या हस्ते आणि तुमच्या अध्यक्षतेखाली होणार होते. मात्र त्यापूर्वीच या पुतळ्याचा कार्यक्रम धनगर आणि मेंढपाळ युवकांनी आज पहाटे केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाबाबत बहुजन समाजात किती अस्वस्थता आहे याचा अंदाज तुम्हाला आला असेल. त्यामुळे बहुजन समाजाच्या भावनांचा आदर करून या कार्यक्रमास उपस्थितीत राहण्याबाबत तुम्ही योग्य निर्णय घ्याल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो असे या पत्रात भूषणसिंहराजे होळकर यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- महिलाच्या सन्मानाच्या गप्पा मारणारे पुरोगामी पुढारी पूजा चव्हाण प्रकरणात गप्प का ?
- बॉलिवूडचा शहेनशहा शरद पवारांना भेटण्यासाठी थेट बारामतीत?
- समांतर च्या ठेकेदाराचा कोर्टात जाण्याचा इशारा; प्रकरण शासनाकडे सोपावणार मनपाचा निर्णय
- पुन्हा स्टेडिअमवर कलकलाट ! प्रेक्षकांच्या आगमनासाठी बीसीसीआय आतुर, शेअर केला व्हिडिओ
- कोहलीच्या नेतृत्वाला धोका नाही, पण….
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
