🕒 1 min read
मुंबईः बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात आत्महत्या केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे, ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती, परंतु रविवारी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तिनं आपली जीवनज्योत विझवली. ही आत्महत्या आहे की तिला कोणी मारलं? असा प्रश्न भाजपा महिला आघाडीने उपस्थित करून या प्रकरणाला वेगळंच वळण दिलं, या २२ वर्षीय तरूणीचे ठाकरे सरकारमधील कथित मंत्र्यांसोबत प्रेमसंबंध होते, त्यातून तिने आत्महत्या केल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
या प्रकरणाशी संबंधित काही कथित ऑडिओ क्लिपसुद्धा व्हायरल झाल्या असल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवर म्हटलं की, पूजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे अपडेट्स पहाता याचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोडांकडे जातो. पोलिसांनी स्यु-मोटोतंर्गत तक्रार दाखल करत मंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. मुख्यमंत्रीजी एवढे पुरावे असतानाही मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहाताय असा सवालही त्यांनी विचारला आहे.
दरम्यान अद्याप सरकार कडून यावर कोणीही बोलले नव्हते नुकतच नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनीही या प्रकरणी सावध प्रतिक्रिया दिलीय. ‘झालेली घटना दुर्दैवी आहे, मात्र थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडणे योग्य नाही, या प्रकरणी माहिती घेतल्यानंतर बोलणे उचित राहील, थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव घेणं योग्य नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत. टीव्ही 9 मराठीकडे एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केलीय. शिवसेनेची या प्रकरणात ही पहिलीच प्रतिक्रिया आहे.
संजय राठोड हे शिवसेनेचे विदर्भातील बडे नेते आहेत. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची जबाबदारीदेखील देण्यात आली. 30 डिसेंबर 2019 रोजी त्यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले होते. आताच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे वनमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- महिलाच्या सन्मानाच्या गप्पा मारणारे पुरोगामी पुढारी पूजा चव्हाण प्रकरणात गप्प का ?
- बॉलिवूडचा शहेनशहा शरद पवारांना भेटण्यासाठी थेट बारामतीत?
- समांतर च्या ठेकेदाराचा कोर्टात जाण्याचा इशारा; प्रकरण शासनाकडे सोपावणार मनपाचा निर्णय
- पुन्हा स्टेडिअमवर कलकलाट ! प्रेक्षकांच्या आगमनासाठी बीसीसीआय आतुर, शेअर केला व्हिडिओ
- कोहलीच्या नेतृत्वाला धोका नाही, पण….
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
