चेन्नई : भारताचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफर यांनी नुकतेच उत्तरखंड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. उत्तराखंडमध्ये झालेल्या झालेल्या वादानंतर वासिम जाफर यांनी हे पाऊल उचलले. वसीम जाफर यांच्यावर धर्मावर आधारीत संघ निवडीचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. वासिम जाफर यांनी बुधवारी त्यांच्यावरील हा आरोप फेटाळून लगावले. याबाबत वसीम जाफरचा माजी सहकारी आणि टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याला विचारण्यात आलं, पण याबाबत रहाणेने प्रतिक्रिया देणं टाळलं.
‘मला या प्रकरणाबाबत काहीही माहिती नाही. नक्की काय झालं आहे, याची कल्पना नसताना मी या विषयावर बोलणार नाही,’ असं अजिंक्य रहाणे म्हणाला आहे. जाफर आणि अजिंक्य रहाणे मुंबईकडून, वेस्ट झोन आणि इंडियन ऑईल कॉरपोरेशनकडून क्रिकेट खेळले आहेत. दुसरीकडे अनिल कुंबळे, इरफान पठाण, मनोज तिवारी आणि मुंबईचे माजी क्रिकेटपटू शिशीर हट्टंगडी यांनी वसीम जाफरला पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, माहिम वर्मा यांनी मीडियाच्या माध्यमातून, मी मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य देत असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे मला प्रचंड दु:ख झाले आहे, असे वासिम जाफर यांनी सांगितले.“संघ निवडीत जातीयवादाचा अँगल आणणे, खूप दु:खद आहे” असे वासिम जाफर पत्रकार परिषदेत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- भारत आणि इंग्लंड संघात आज होणार काट्याची टक्कर ; भारतीय संघ तगड्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात
- ‘भाजपने काव काव करायचे आणि राजपालांनी त्यांना चहापानास बोलवायचे ही कोणती घटनात्मक संस्कृती ?’
- समांतर च्या ठेकेदाराचा कोर्टात जाण्याचा इशारा; प्रकरण शासनाकडे सोपावणार मनपाचा निर्णय
- बॉलिवूडचा शहेनशहा शरद पवारांना भेटण्यासाठी थेट बारामतीत?
- बॉलिवूडचा शहेनशहा शरद पवारांना भेटण्यासाठी थेट बारामतीत?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
