Share

‘ठाकरे सरकार नशा बहाद्दरांचे आहे, उत्सवप्रेमींचे नाही’

Published On: 

मुंबई : छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव १९ फेब्रुवारीला साजरा केला जातो. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्याने यंदाची शिवजयंती साधेपणाने साजरी करावी, असा आदेश गृह विभागाने नुकताच काढला आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुकांना बंदी घालण्यात आली आहे.

राज्य सरकारने शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत. कोरोना आटोक्यात आला असला तरी शिवजयंतीसाठी निर्बंध लावण्यात आले असल्याने शिवभक्तांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच भाजपने देखील सरकारवर या निर्णयामुळे अनेक प्रकारे टीकास्त्र डागलेले आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी सरकारला फटकारले आहे. ते म्हणाले कि, एकीकडे हे सरकार बार आणि पब्स सुरु ठेवण्याच्या कालावधीत वाढ करते. मात्र, दुसऱ्या बाजूला उत्सवप्रेमींच्या आनंदात खोडा घालते, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

ठाकरे सरकारला गणपती उत्सवाच्या तयारीला किती वेळ लागतो हे माहिती नाही का? गणेशमुर्ती चार दिवसांत तयार होतात का? नियम आधीच का जाहीर केले नाहीत? आता तयार झालेल्या मुर्त्यांचे काय करायचे? कोणीही मागणी न करता बार, पब्स रात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मोकळीक देणार आणि हिंदुंच्या गणेशोत्सवात मात्र विघ्न घालणार. हे सरकार नशा बहाद्दरांचे आहे की उत्सवप्रेमींचे, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला.

आशिष शेलार गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारला चांगलेच फैलावर घेतले. माघी गणेशोत्सवासाला केवळ ५ दिवस बाकी असताना ९ फेब्रुवारीला राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यामध्ये गणेशमूर्तीची उंची ४ फुट आणि मंडपांच्या आकारावर ही निर्बंध घातले, असे शेलार यांनी म्हटले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!