🕒 1 min read
औरंगाबाद : जिल्ह्यामध्ये कोविड-19 लसीकरणाबाबत विश्वासार्हता वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस उपायुक्त, झोन-२ (शहर औरंगाबाद) यांनी गुरुवारी (दि.११) सकाळी साडेअकरा वाजता चिकलठाण्यातील जिल्हा रुग्णालयात लस घेतली. लस पूर्णपणे सुरक्षित आहे, त्यामुळे कोणीही मनात भीती न बाळगता लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी फ्रंटलाइन वॉरियर्सला केले.
लस घेतल्यानंतर जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अर्धा तास ऑबझर्व्हेशनमध्ये होते. त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास यावेळी झाला नाही.
जिल्हा लसीकरण मोहीम यशस्वीतेसाठी मोठया प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच केले आहे. औरंगाबाद जिल्हयातील शासकीय व अशासकीय आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांना १६ जानेवारी २०२१ पासून आजपर्यंत एकूण २३ लसीकरण केंद्रांवर १५ हजार १३८ व्यक्तींना लसीकरण केले आहे. जनतेमध्ये या मोहिमेबाबत विश्वासार्हता वाढविण्यासाठी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी आज लस घेतली आहे.
जिल्ह्यातील संबधित उपविभागीय अधिकारी, तालुकास्तरावरील तहसिलदार, पोलीस उपअधीक्षक, नगरपालिका मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक आपल्या स्तरावरील लसीकरण केंद्रांवर लसीकरण मोहिमेत सहभागी होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ई-रिक्षा चालवणारी कोण आहे ‘हि’ अभिनेत्री ?
- गावकऱ्यांच्या मागणीची सोनू कडून दखल; पकडून दिले वानर…
- राज्यात कॉंग्रेसला क्रमांक एकचा पक्ष बनविण्याचा पटोलेंचा दावा खरा ठरेल का ?
- राज्यपालांना विमान नाकारलं, अजित पवार म्हणतात…
- आणि कार्यकारी संचालकांनी राजिनामा दिला… चर्चेला उधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
