Share

अर्थमंत्री निर्मला सीतारामन देणार अर्थसंकल्पावरील प्रश्नांना राज्यसभेत उत्तर

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: सध्या संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडत आहे. यावेळी अधिवेशनाचे पहिले सत्र १३ फेब्रुवारीला संपत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या (12 फेब्रुवारी) केंद्रीय अर्थसंकल्पावर विचारलेल्या प्रश्नांना राज्यसभेत उत्तर देणार आहेत.

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 1फेब्रुवारीला 2021-22 मध्ये लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला होता. यावर आता राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पहिले सत्र 13 फेब्रुवारीला संपत आहे. अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाचे दुसरे सत्र 8 मार्चला सुरू होत आहे. तर 8 एप्रिलला हे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच नवीन सुधारणांसाठी महत्वाचे निर्णय घेतले यामध्ये 75 वर्षांवरील पेन्शनधारकांना आयटी रिटर्न भरण्यापासून सुटआरोग्य क्षेत्रासाठी 2.23 लाख कोटींची तरतूदनव्या आरोग्य योजनेसाठी 64 हजार कोटींच्या तरतूदीची घोषणाकोरोना लसीकरणासाठी 35 हजार कोटींची तरतूदमिशन पोषण 2.0 चा शुभारंभ करणार16.5 लाख कोटी कृषी कर्ज वाटपाचे उद्दिष्टलहान सिंचन प्रकल्पांसाठी 5 हजार कोटींची तरतूदरस्ते मंत्रालयासाठी 1.18 लाख कोटींची तरतूद मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी 64 हजार कोटींची तरतूद अशा घोषणांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!