🕒 1 min read
नवी दिल्ली : देश कोरोनातून सावरत असला तरी सद्या शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकारची डोकेदुखी वाढत आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरु आहे. ७८ दिवस उलटून देखील शेतकरी व केंद्र सरकार यांच्यातील कोंडी कायम आहे. विरोधकांनी देखील यावरून सरकारला घेरल्याचं दिसून येत आहे.
याच पार्श्वभूमीवर सरकारवर होणाऱ्या आरोपांचं खंडन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत बोलताना केलं आहे. सद्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शरद पवार यांनी देखील या कायद्यांमध्ये असलेल्या तरतुदींची मागणी याआधी केल्याचे आरोप भाजप नेत्यांनी केले होते. त्यांनी, विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र देखील भाजपने समोर आणले होते. मात्र, आता खुद्द मोदींनी लोकसभेत पवारांच्या भूमिकेवर भाष्य केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांच्या जुन्या वक्तव्याचा दाखलाच लोकसभेत मांडला.
शरद पवारांनी भूमिका पलटल्याची टीका नरेंद्र मोदींनी लोकसभेत केली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. मोदींच्या या टीकेला सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्या पक्षाच्या प्रमुखांवर मोदींनी टीका केली. त्यांना उभे राहून मी थांबवू शकत होते, पण ही आमची संस्कृती नाही, असं सुळे म्हणाल्या.
तर, ‘मला काही कागदपत्रे, तथ्य समोर मांडायचे आहे. भाजप सदस्य असले तरी ते देशाचे पंतप्रधान असल्याने त्यांनी सभागृहात मांडलेला मुद्दा गांभीर्याने घेण्याची गरज आहे. शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्राचा दाखला दिला. पण यावेळी राज्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे अंमलबजावणी केली जावी हे त्यांनी वाचले नाही,’ असा आरोप देखील सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदींवर केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ई-रिक्षा चालवणारी कोण आहे ‘हि’ अभिनेत्री ?
- गावकऱ्यांच्या मागणीची सोनू कडून दखल; पकडून दिले वानर…
- गायकर यांचं धोतर फेडण्याची भाषा करणाऱ्या अजितदादांनीच सीताराम गायकरांना दिला बाय
- राज्यपालांना विमान नाकारलं, अजित पवार म्हणतात…
- आणि कार्यकारी संचालकांनी राजिनामा दिला… चर्चेला उधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

