Share

आता जनताच या तिन्ही पक्षांची घमेंड उतरवेल; अशिष शेलारांची ठाकरे सरकारवर टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:- राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार हा वाद आणखी गडद होताना दिसत आहे. आता तर राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे. आश्चर्य म्हणजे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरुन परत राजभवनावर येण्याची नामुष्की ओढावली होती.

राज्यपाल विरुद्ध महाराष्ट्र सरकार हा वाद पहिल्या दिवसापासून सुरु आहे. मग ते शपथविधी दरम्यान घेतलेल्या नेत्यांच्या नावावरुन असो वा आता रखडलेल्या 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन असो, हा वाद वाढतच आहे. आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडकडे जात होते. त्यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, राज्यपाल पदावरील व्यक्तीला परवानगी नाकारल्याने भाजप नेते चांगलेच संतापले आहेत. राज्यपालांना महाविकास आघाडी सरकारनं विमानातून उतरवल्यानंतर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही ठाकरे सरकारला खडे बोल सुनावलेत.

महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांना विमानातून उतरवलंय, आता महाराष्ट्रातील जनता या तिन्ही पक्षांची घमेंड उतरवेल. राज्य सरकारने आता राज्यपालांचा हीन दर्जाने अपमान करू असं धोरण स्वीकारलंय, असं म्हणत आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुंबईत त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींकडे ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!