🕒 1 min read
नवी दिल्ली- हरवलेले पाकीट फक्त भाग्यवानांना परत मिळते असं बोलले जाते. काही महिन्यांनंतर लोक ते पुन्हा भेटेल याची आशा देखील सोडतात. परंतु जेव्हा आपल्याला तब्बल पन्नास वर्षानंतर आपले हरवलेलं पाकीट पुन्हा मिळालं तर ?
अमेरिकेत नेमके हेच घडले आहे. यूएस नेव्हीच्या माजी हवामानशास्त्रज्ञांना 53 वर्षानंतर त्यांचे हरवलेले पाकीट परत मिळाले आहे. अंटार्कटिका येथे मुक्कामी असताना 91 वर्षीय पॉल ग्रीश यांचे पाकीट हरवले होते. पॉल ग्रिशम एका वर्षासाठी 1967 मध्ये अंटार्क्टिका येथे गेले होते. ग्रीशम अंटार्क्टिकाच्या रॉस बेटापासून विज्ञान स्टेशन आणि विमानतळासाठी हवामानाची परिस्थिती सांगत असायचे. अंटार्क्टिकाहून कॅलिफोर्नियाला परतल्यानंतर 13 महिन्यांनंतर त्याला कळले की तिथेच आपले पाकीट ते विसरले आहेत. यानंतर अनेक प्रयत्न करूनही पाकीट त्याला मिळालेले नाही.
आता 53 वर्षांनंतर, पॉल ग्रिशम यांना अंटार्क्टिकामध्ये स्नो कॅप्सवर संशोधन करणाऱ्या एजन्सीसाठी काम करणाऱ्या स्टीफन डायगेटो आणि ब्रुस मॅककीच्या मदतीने त्याने हे हरवलेले पाकीट मिळाले आहे. पॉल ग्रिशम यांचे नेव्ही आयकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, त्याचे कर कागदपत्रे आणि अगदी पाककृती अशा बऱ्याच वस्तू वॉलेटमध्ये सापडल्या आहेत.

सीएनएनच्या वृत्तानुसार, पॉल ग्रिशम नेव्हीमध्ये 25 वर्षे काम केल्यानंतर 1977 मध्ये निवृत्त झाले. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्याने कॅरोली सालाझारशी लग्न केले. 2001 मध्ये पॅरिसमध्ये त्यांची भेट झाली. ग्रीशम आणि कॅरोली 18 वर्षांपासून एकमेकांसोबत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ई-रिक्षा चालवणारी कोण आहे ‘हि’ अभिनेत्री ?
- गावकऱ्यांच्या मागणीची सोनू कडून दखल; पकडून दिले वानर…
- राज्यात कॉंग्रेसला क्रमांक एकचा पक्ष बनविण्याचा पटोलेंचा दावा खरा ठरेल का ?
- राज्यपालांना विमान नाकारलं, अजित पवार म्हणतात…
- आणि कार्यकारी संचालकांनी राजिनामा दिला… चर्चेला उधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

