Share

राज्यात कॉंग्रेसला क्रमांक एकचा पक्ष बनविण्याचा पटोलेंचा दावा खरा ठरेल का ?

Published On: 

🕒 1 min read

दीपक पाठक/पुणे- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह नवनियुक्त कार्याध्यक्ष व उपाध्यक्ष आज ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान येथील कार्यक्रमात महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पदभार स्वीकारणार आहेत.
तत्पूर्वी,पटोले यांनी केलेल्या एका केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा होत आहे.महाराष्ट्रात काँग्रेस आगामी काळात एक नंबरचा पक्ष बनवणार’, असा निर्धार नाना पाटोळे यांनी केला आहे याची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

महाराष्ट्रात कॉंग्रेस अधिक बळकट करण्यासाठी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षासोबत महाराष्ट्रात आणखी काही संघटनात्मक बदल केले जात आहेत. संघटनात्मक बदल करताना मंत्र्यांऐवजी पूर्णवेळ पक्षासाठी काम करणाऱ्यांना संधी देण्याकडे काँग्रेस पक्षश्रेष्ठीचा कल असल्याचे समजते.केवळ विदर्भातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात कॉंग्रेसला सुगीचे दिवस आणण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. याशिवाय कोणत्याही परिस्थितीत कॉंग्रेस क्रमांक पहिला गाठायचा असल्यास भाजपला रोखण्यासाठी पटोले यांना सर्वतोपरी प्रयत्न लागणार याबद्दल कोणतीही शंका नाही.

सद्यस्थिती पाहता नैराश्येच्या गर्तेत सापडलेल्या कॉंग्रेसला नवसंजीवनी देण्याची ताकत पटोले यांच्यात आहे. विदर्भाचे प्रतिनिधित्व करणारे पटोले हे अतिशय आक्रमक स्वभावाचे नेते आहेत.ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक असतात.शेतकऱ्यांच्या समस्यांची नेमकी जाण त्यांना आहे.उत्तम वक्तृत्व,सुसंस्कृतपणा,राजकीय अनुभव याशिवाय सर्वपक्षीय नेत्यांशी असणारे चांगले संबंध या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.

कॉंग्रेसचा भाजपा थेट शत्रू आहे मात्र कॉंग्रेसला महाराष्ट्रात क्रमाक एकच पक्ष व्हायचे असेल तर त्यांची स्पर्धा मित्रपक्ष असणाऱ्या सेना आणि राष्ट्रवादीशी देखील असणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा वाळवीप्रमाणे कॉंग्रेसला संपवत असल्याची वारंवार दबक्या आवाजात चर्चा असते आणि काहीअंशी हे सत्य देखील आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपशी संघर्ष करत असताना त्यांना मित्रपक्षांशी पण संघर्ष करावा लागू शकतो.

नवीन प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यावर बहुतांश नेते हे अशाच पद्धतीचे दावे करून आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत असतात मात्र पटोले यांनी केलेले हे वक्तव्य इतर नेत्यांच्या वक्तव्याप्रमाणे नाही हे त्यांना सिद्ध करावे लागेल.हे करत असताना प्रसंगी काही कठोर निर्णय देखील घ्यावे लागतील.गेल्या काही वर्षात पक्षातून सुरु असलेली गळती पाहता त्यांनी अश्या पद्धतीने दावा करणे यात फार कांही आश्चर्य वाटण्यासारखे नाही.

हायकमांड आणि महाराष्ट्रातील नेते यांच्या योग्य समन्वय राखण्याचे देखील आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.घराणेशाहीच्या जोखडातून पक्षाला बाहेर काढण्याचे काम केल्याशिवाय महाराष्ट्रात काँग्रेस आगामी काळात एक नंबरचा पक्ष होईल अशी शक्यता कमीच आहे.जुन्या आणि नव्या नेत्यांचा ताळमेळ घालण्यात पटोले यशस्वी होणार का ? भाजपला रोखत आणि सेना-राष्ट्रवादीला पछाडत कॉंग्रेस पुन्हा क्रमांक एकचा पक्ष होणार का ? या सरख्या असंख्य प्रश्नांची उत्तरं आगामी काळात मिळतील हीच अपेक्षा.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!