🕒 1 min read
मुंबई: कोरोना काळात हजारो स्थलांतरित मजुरांना आपल्या घरी पोहचण्यास मदत करण्यापासून सुरु झालेला अभिनेता सोनू सुदच मदत कार्य अद्याप देखील सुरु आहे. यामध्ये त्याने वेळोवेळी अनेकांना मदतीचा हात पुढे केला आहे. कधी ऑपरेशन साठी मदत, कधी आर्थिक मदत तर कधी विद्यार्थांना आणि गरजू शेतकर्यांना मदत करणाऱ्या सोनू कडे लोक त्यांच्या मागण्या घेऊन जातात आणि तो तात्काळ मदत देखील करतो.
आता देखील एका गावातील काही ग्रामस्थांनी सोनूकडे एक मागणी केली होती. मात्र या मागणी मुळे सोनुने चक्क कपाळावर हात मारून घेतला आहे. कारण या ग्रामस्थांनी केलेल्या मागणी अशी होती की, वानरांचा बंदोबस्त करण्याची. होय, बासु गुप्ता नामक एका ट्विटर युजरने सोनूकडे गावाची कैफियत मांडली.
‘सोनू सूद सर, आमच्या गावात एका वानराने उच्छाद मांडला आहे. त्याच्या हल्ल्यात डझनावर लोक जखमी झाले आहेत. या वानराला गावातून बाहेर दूर जंगलात नेऊन सोडावे, अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो,’ अशा शब्दांत बासु गुप्ताने आपली अडचण सांगितले. आपल्या पोस्टसोबत त्याने गावक-यांचा फोटोही जोडला होता .
https://twitter.com/SonuSood/status/1359742310175502343
सोनू सूदच्या नजरेतून हे ट्विट सुटले नाही. हे ट्विट पाहिल्यानंतर अपेक्षेनुसार, लगेच सोनूने त्यावर उत्तर दिले. ‘बस अब बंदर पकडना ही बाकी रह गया था दोस्त, असे मजेशीर उत्तर त्याने दिले. इतक्यावरच सोनू थांबला नाही तर त्याने या गावक-यांना निराश न करता त्यांनाही मदतीचे आश्वासन दिले. पता भेज, यह भी करके देख लेते हैं, असे त्याने लिहिले.
सोनूने ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. घ्या, आता वानरालाही पकडून दिलं. आता बोला… असे मजेशी ट्विट सोनू सूदने केलंय. सोनूने या ट्विटसोबत एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्यामध्ये, येथील वानराने गावातील काही जणांना जखमी केले होते, त्यांच्या प्रतिक्रिया आहेत. तसेच, गावात वानराला पकडतानाचेही व्हिजूव्यल या व्हिडिओत दिसत आहेत. सोनूच्या सांगण्यावरुन या वानराला पकडून जंगलात सोडून देण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- “जर एखाद्या ट्विटवरुन ‘या’ सेलिब्रिटींना कुणी जज करत असतील, तर ते देशविरोधी आहेत”
- ठाकरे सरकारनं सूड भावनेचा अतिरेक केला; प्रवीण दरेकरांचा घणाघात
- लग्नाचे आमिष दाखवून तरूणीला दारू पाजली; लॉजवर नेऊन केले गैरकृत्य
- अर्जुन तेंडुलकरला मोठा झटका; मुंबईच्या संघात मिळाले नाही स्थान
- तुळजापुरात शिवसेना, युवा सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, छावासह शिवभक्तांचा एकत्र जल्लोष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
