उस्मानाबाद: उस्मानाबाद जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक पी.एम.भुक्तर यांनी मुदत संपण्यापुर्वीच आपला राजीनामा दिला आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. यामुळे आधिच आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या सुधारणेच्या प्रयत्नांना जागोजागी खीळ बसत आहे असे चित्र निर्माण झाले आहे.
राज्यातील अर्धा डझन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आर्थिकदृष्ट्या डबघाईस आल्या होत्या. परंतु, इतर बँकांनी विविध माध्यमातून मदत मिळवून बँकेचा कारभार सुरळीत केला. परंतु, उस्मानाबाद जिल्हा बँकेची वाटचाल तब्बल १५ वर्षापासुन अडखळत सुरू आहे. याला मुख्य कारण म्हणजे राजकीय उदासिनता, तसेत बँकेचा कारभार सांभाळणाऱ्या माजी अधिकाऱ्यांनी अडचणी वाढवुन ठेवल्या आहेत. त्यामध्ये विविध बाबींवर करण्यात आलेला खर्च, नियोजनशून्य कामकाज आदींचा समावेश आहे. यादरम्यान पी.एम.भुक्तर यांनी जून २०१९ मध्ये कार्यकारी संचालक या पदाचा कारभार स्विकारला.
परंतु, कार्यकारी संचालक पदाची सुत्रे घेतल्यापासून मागील दीड वर्षात नवीन सुधारणाऐवजी कोर्ट, कचेऱ्या, प्रशासकीय, तसेच राज्य शासनाकडून मदतीस होणारा विलंब अशा कठीण प्रसंगात बँकेचा कारभार कसा सुधारायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहीला. यासाठी केलेल्या प्रयत्नात कोठेच यश येत नसल्याने अखेर भुक्तर यांनी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीसमोर आपला राजीनामा ठेऊन रामराम केला. एकीकडे शासनासह न्यायालयाकडूनही दिलासा मिळत नसताना दुसरीकडे बँकेच्या कार्यकारी संचालकांनीही मुदतीपूर्वीच दीड वर्षे अगोदर आपला राजीनामा दिल्याने याबाबत बँकेच्या वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- “जर एखाद्या ट्विटवरुन ‘या’ सेलिब्रिटींना कुणी जज करत असतील, तर ते देशविरोधी आहेत”
- ठाकरे सरकारनं सूड भावनेचा अतिरेक केला; प्रवीण दरेकरांचा घणाघात
- लग्नाचे आमिष दाखवून तरूणीला दारू पाजली; लॉजवर नेऊन केले गैरकृत्य
- अर्जुन तेंडुलकरला मोठा झटका; मुंबईच्या संघात मिळाले नाही स्थान
- तुळजापुरात शिवसेना, युवा सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, छावासह शिवभक्तांचा एकत्र जल्लोष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
