औरंगाबाद : फुलंब्री ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ४६२ पैकी २४८ सदस्य भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आहेत. यामध्ये आमच्या विरोधकांनी चालत्या गाडीतून सदस्य ओढत नेले, आम्ही कोणाला बळजबरी आमच्या पक्षात घेतले नाही’ असा दावा भाजपा तालुकाध्यक्ष तथा नगराध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी केला.
नुकत्याच फुलंब्री तालुक्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या संदर्भात ८ फेब्रुवारी रोजी सरपंच व उपसरपंच पद निवडीची प्रक्रिया पार पडली. यामध्ये तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींपैकी ३० ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही आमच्या ताकदीने जास्तीत जास्त सरपंच, उपसरपंच व सदस्य भारतीय जनता पार्टीचेच निवडुन आले आहेत.
५३ पैकी ३० ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आल्याची लिस्ट त्यांनी समोर आणली. याप्रसंगी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण, फुलंब्री पंचायत समितीच्या सभापती सविता फुके, भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र काळे, ओबीसी आघाडीचे तालुका अध्यक्ष राम बनसोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
धामणगाव ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात, भाजपा की शिवसेना?
सरपंच निवडीत फुलंब्री तालुक्यातील धामणगाव येथील ग्रामपंचायतीत एकता ग्रामविकास पॅनलचे सदस्य निवडुन आले तरी ते महाविकास आघाडीचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणतात की सरपंच व उपसरपंच आमच्या पक्षाचे असा दावा करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी : कर्मचार्यांच्या संपामुळे तीन दिवस बँका राहतील बंद !
- दरबार भरला पण राजाची प्रतिक्षा! पोलीस आयुक्तांमुळे नागरिक ताटकळले
- चहावाल्याच्या मुलाने मिळवले जिल्ह्यातील पहिले सुवर्णपदक; राष्ट्रीय स्पर्धेत धडक
- राहुल गांधींनी बजेटमधील कोणतेही पाच आकडे सांगावेत; फडणवीसांचं खुलं ‘चॅलेंज’
- दारूण पराभवानंतर आता ‘या’ गेमचेंजर खेळाडूला संधी देण्याची मागणी धरू लागली जोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
