नवी दिल्ली : देश कोरोनातून सावरत असला तरी, शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकारची डोकेदुखी वाढत आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरु आहे. ७७ दिवस उलटून देखील शेतकरी व केंद्र सरकार यांच्यातील कोंडी कायम आहे. विरोधकांनी देखील यावरून सरकारला घेरल्याचं दिसून येत आहे.
याच पार्श्वभूमीवर सरकारवर होणाऱ्या आरोपांचा खंडन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत केलं आहे. मोदी यांनी लोकसभेत प्रदीर्घ भाषण केले. सुरुवातीला विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकसभा अध्यक्षांनी मध्यस्थी केल्यानंतर मोदींनी आपलं भाषण कायम ठेवलं. तर, काही सदस्यांनी सभात्याग देखील केला.
नरेंद्र मोदी यांच्या भाषणात काँग्रेसच्या खासदारांकडून सातत्याने व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याने संतापलेल्या नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले डागले आहे. ‘सध्याच्या घडीला काँग्रेसची अवस्था अशी झाली आहे की, हा पक्ष धड स्वत:चं भलं करु शकत नाही आणि देशाचंही भलं करू शकत नाही’, असे म्हणत नरेंद्र मोदी कॉंग्रेसवर टीका केली आहे. देशातील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेसमध्ये सध्या दुफळी आणि संभ्रमाचे वातावरण आहे, असाही त्यांनी टोला लगावला.
पुढे बोलताना मोदींनी आंदोलनाच्या नावाखाली उपद्रव करणाऱ्यांवर निशाना साधला आहे. शेतकऱ्यांच्या पवित्र आंदोलनाला अपवित्र करण्याचं काम ‘आंदोलनजीवीं’नी केलं’, असा आरोप देखील त्यांनी केला. ‘शेतकरी गरिबीत चाचपडत राहो, असे कोणालाही वाटत नाही. शेतकऱ्यांच्या पवित्र आंदोलनाला अपवित्र करण्याचं काम ‘आंदोलनजीवीं’नी केलं’, असे मोदी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी : कर्मचार्यांच्या संपामुळे तीन दिवस बँका राहतील बंद !
- दरबार भरला पण राजाची प्रतिक्षा! पोलीस आयुक्तांमुळे नागरिक ताटकळले
- चहावाल्याच्या मुलाने मिळवले जिल्ह्यातील पहिले सुवर्णपदक; राष्ट्रीय स्पर्धेत धडक
- राहुल गांधींनी बजेटमधील कोणतेही पाच आकडे सांगावेत; फडणवीसांचं खुलं ‘चॅलेंज’
- दारूण पराभवानंतर आता ‘या’ गेमचेंजर खेळाडूला संधी देण्याची मागणी धरू लागली जोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
