🕒 1 min read
नवी दिल्ली- ५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. कोरोनाचे सावट लक्षात घेता मोजक्याच निमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला असला तरी जगभरातील रामभक्तांनी हा सोहळा असेल त्या ठिकाणाहून बघत या ऐतिहासिक क्षणाचा अनुभव घेतला होता.
राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना केली आहे. या राम मंदिराच्या प्रत्यक्ष निर्माण कार्यास देखील सुरुवात झाली आहे. तर, मंदिर उभं करण्यासाठी लागणार खर्च हा करोडो रामभक्तांमार्फत संकलित केला जात आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेने देखील राम मंदिर निर्माण सहयोग अभियान सुरु केले आहे. भाजपने देखील निधी संकलनासाठी सक्रिय सहभाग घेतला असून देशभरात हे अभियान राबविले जात आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून सध्या सुमारे १००० कोटी रुपयांचा निधी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट ट्रस्टकडे जमा झाला आहे. १५ जानेवारीपासून या ट्रस्टने देशभरात देणगी मोहिमेला प्रारंभ केला. याद्वारे आत्तापर्यंतच ट्रस्टकडे १००० कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे.दररोज जमा होत असलेला निधी बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केला जात आहे. राम मंदिरासाठी देणगी देणाऱ्या प्रत्येकाला संबंधित पैशांची पावती दिली जात आहे.
दरम्यान, राम मंदिरासाठी देणगी देण्याऱ्या एका कॉंग्रेसच्या आमदाराने देणगी दिल्यावर चक्क मुस्लीम समुदायाची माफी मागितली आहे.राम मंदिराच्या बांधकामासाठी देणगी दिल्यावर केरळचे कॉंग्रेसचे आमदार अल्धोस कुन्नाप्ली (एल्डहोस कुन्नाप्ली) यांनी मुस्लिम समुदायाची माफी मागितली आहे. कॉंग्रेसच्या नेत्याने मुस्लिम समुदायाला सांगितले आहे की जर त्यांनी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या तर त्यांनी दिलगिरी व्यक्त करतो.
ऑप इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार या कॉंग्रेस नेत्याने चतुराईने त्यांच्याकडून पैसे घेतल्याबद्दल आरएसएसला दोष दिला आहे. कुन्नपिली म्हणाले की, मंदिर बांधण्यासाठी देणग्या गोळा करण्यासाठी काही लोक त्यांच्याकडे आले होते, परंतु ते आरएसएसचे असल्याचे सांगण्यात आले नाही. किंवा त्यांनी हि देणगी राम मंदिरासाठी घेत असल्याचे देखील नमूद केले नाही. स्वत: ला निर्दोष असल्याचे सांगत या कॉंग्रेसच्या नेत्याने सांगितले की नेहमीप्रमाणे 1000 रुपयांची देणगी दिली. पण नंतर ते राम मंदिरासाठी असल्याचे सांगत पसरविण्यात आले.
याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, मी एक धर्मनिरपेक्ष व्यक्ती आहे आणि मला मूर्ख बनविण्यात आले आहे. आपल्या व्हिडिओमध्ये त्यांनी मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्याबद्दल खेद व्यक्त करताना त्यांनी म्हटले आहे की, मुस्लीम समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
महत्वाच्या बातम्या
- बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी : कर्मचार्यांच्या संपामुळे तीन दिवस बँका राहतील बंद !
- दरबार भरला पण राजाची प्रतिक्षा! पोलीस आयुक्तांमुळे नागरिक ताटकळले
- चहावाल्याच्या मुलाने मिळवले जिल्ह्यातील पहिले सुवर्णपदक; राष्ट्रीय स्पर्धेत धडक
- राहुल गांधींनी बजेटमधील कोणतेही पाच आकडे सांगावेत; फडणवीसांचं खुलं ‘चॅलेंज’
- दारूण पराभवानंतर आता ‘या’ गेमचेंजर खेळाडूला संधी देण्याची मागणी धरू लागली जोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
