Share

ते आम्हाला कोर्टात जाऊ देणार नाहीत, अजितदादांचा राज्यपालांना सूचक इशारा !

Published On: 

नाशिक : महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी व राज्यपाल यांच्यात वाद सुरु झालेला आहे. कोरोना काळात मंदिरे उघडण्यावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. या वादात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही उडी घेतली होती. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित पुरोगामी झाला आहात का असा सवाल केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती.

आझाद मैदानातील शेतकरी आंदोलनावरूनही राज्यपालांवर टीकेची झोड उठवली गेली होती. तसेच राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका असतानाच, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांना न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे अजूनही प्रलंबित असल्यामुळे वाद वाढण्याची शक्यात आहे. त्यामुळेच अजित पवार यांनी राज्यपालांना न्यायालयात जाण्याचाच इशारा दिलाय.

‘महाविकास आघाडी सरकारने नियमानुसार राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी तयार करून ती यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवली आहे. बरेच महिने उलटूनही राज्यपालांनी याबद्दल कोणताही निर्णय घेतला नाही’, असे म्हणत राज्यपाल लवकरच नावं जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. ते आम्हाला कोर्टात जाऊ देणार नाही असं वाटतंय, असं सूचक विधान अजित पवार यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!