Share

कडकनाथ कोंबड्या मागे लागल्यानंतर कळेल खोतांना; पवारांवरील टीकेनंतर मुश्रीफांचा पलटवार

Published On: 

कोल्हापूर : दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरुन पॉपस्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी केलेल्या टिप्पणीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्याकडून अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर देण्यात आलं. “भारताच्या सार्वभौमत्वाविषयी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारतामधील घडामोडींबाबत देशाबाहेरील लोक प्रेक्षक असू शकतात, पण त्यांनी हस्तक्षेप करता कामा नये”, असं सचिनने ट्विटमधून ठणकावून सांगितलं. मात्र, या ट्विटवरुन शेतकरी आंदोलनाला पाठींबा देणाऱ्यांनी सचिनवर टीका केली आहे.

तर, भाजपसह कायद्यांचे समर्थन करणाऱ्या नेत्यांनी सचिनला पाठींबा दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘ज्यांना ज्या क्षेत्रातलं कळतं त्यातलं त्यांनी बोलावं’ असा सल्ला देत त्यांनी सचिन तेंडुलकरवर निशाणा साधला होता. पवारांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी टीकास्त्र सोडलं होतं.

‘शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का तरी ते अध्यक्ष होते. ते कोणत्या फडात कुस्ती खेळले? तरीही ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. अनेकांना वाटतं मला सोडून दुसऱ्याला कळत नाही. अशी कमी लेखण्याची पद्धत काही लोकांनी राज्यात लावली आहे. हे योग्य नसून नवीन नेतृत्वाला हानीकारक आहे.’ असं भाष्य खोत यांनी काल साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधताना केलं होतं.

सदाभाऊ खोत यांच्या या टीकेला राष्ट्रवादीने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवारांनी वडिलकीच्या नात्याने सचिन तेंडुलकरला सल्ला दिला. शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत भाजपमध्ये गेले आहेत. पवारांवर टीका करताना त्यांना लाज वाटायला हवी होती. पवार साहेब, हे खेळावर प्रेम करणारे आणि खेळाची आवड असलेली व्यक्ती आहे. त्यांनी आयपीएल सुरू करून ग्रामीण भागातील टॅलेंट शोधून काढण्याचं काम केलं.’ असं ते म्हणाले.

तर, ‘क्रिकेटपटूंना निवृत्तीनंतर मानधन मिळवण्यासाठी योजना आणली. खोतांनी तर कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायातून त्यांनी अनेक बेरोजगारांनना फसवले. त्यांच्या चिरंजीवावर पोलीस केस आहे. कडकनाथ कोंबड्या मागे लागल्या की कळेल खोतांना,’ असा टोला मुश्रीफांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!