मुंबई : 1 फेब्रुवारीपासून मुंबईतील लोकलसेवा सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसोबत इतर काही लोकांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली होती. पण सर्वसामान्य माणसांना मात्र परवानगी देण्यात आलेली नव्हती. आता मात्र गर्दी होणार नाही अशा वेळा आखून मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी सर्वसामान्यांना देण्यात आली आहे.
सामान्य मुंबईकरांना वेळेचं निर्बंध घातल्यानंतर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दिवसाची पहली ट्रेन सुरु झाल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत तसेच दुपारी 12 वाजेपासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत आणि त्यानंतर रात्री 9 वाजेपासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करण्यात मुभा देण्यात आली आहे. मात्र, ही वेळ चाकरमान्यांना सोयीची नसून सकाळी लवकर जावे लागते व येताना बेस्टचा आधार घेऊनच घरी परतावे लागते. बसभाडे, बससाठी लागणाऱ्या रांगा यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
तर, गर्दी कमी करण्यासाठी वेळेची मर्यादा घालण्यात आली असली तरी याचा विपरीत परिणाम दिसत असून अधिक गर्दी होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्य शासन मुंबईकरांना आणखी मोठा दिलासा देण्याच्या तयारीत असल्याचे समजत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उद्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार का ? हे लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान, कोरोनाची स्थिती सद्या सारखी आटोक्यात राहिली तर लोकल सामान्य वेळेत देखील सुरु करता येईल असा दुजोरा मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या काय निर्णय घेणार हे महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्रातील भाजपचे नेते उठसुठ आंदोलन करत होते, त्यांना काय म्हणायचं ते आम्हाला आता कळलं’
- …म्हणूनच आम्ही ठाकरे सरकारला स्थगिती सरकार म्हणतो; नवनीत राणा बरसल्या
- ‘खरे मोदी कोण? हा प्रश्न पंतप्रधानांनाच विचारायला हवा’
- भाजपच लहानसहान गोष्टींवर आंदोलन करतं, त्यामुळे तेच ‘आंदोलनजीवी’ – भुजबळ
- उद्धवा, अजब तुझे सरकार…देतो म्हणालात दहा हजार, हातावर ठेवले दोन हजार…अजब तुझे सरकार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
