Share

कवी डॉ. बालाजी इंगळे यांच्या काव्यसंग्रहास उत्कृष्ट पुरस्कार

Published On: 

उमरगा : कवी डॉ. बालाजी इंगळे यांच्या कोरोना काळावरील ‘या परावलंबी दिवसात’ या काव्यसंग्रहास उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते बालाजी इंगळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कवी डॉ. बालाजी मदन इंगळे यांनी कोरोना काळात ‘या परावलंबी दिवसात’ या काव्यसंग्रहाची निर्मिती केली होती. यासाठी त्यांना ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कार्यवाह डॉ. शंकर बोऱ्हाडे आणि साहित्यकणा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.

रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी साहित्यकणा फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय गोराडे, सचिव विलास पंचभाई, प्रा. राज शेळके मान्यवर आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!