🕒 1 min read
चेन्नई : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मध्ये भारतीय संघाला आपल्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर विजय मिळवून देणाऱ्या रिषभ पंत याचा बोलबाला इंग्लंड संघाविरुद्धही दिसून आला. रिषभ पंत याने इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात ताबडतोड फलंदाजी केली. त्याने सहाव्या क्रमांकावर येऊन, संघ संकटात असताना अवघ्या ४० चेंडूवर अर्धशतक पूर्ण केले.
भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना शुक्रवार(५ फेब्रुवारी) पासून सुरु झाला आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात ७४ षटकांंत ६ बाद २५७ धावा केल्या आहेत. या डावात भारताकडून रिषभ पंतने तुफानी अर्धशतकी खेळी केली. याबरोबरच त्याने एक खास विक्रम केला आहे.
पंतने मायदेशात खेळताना सलग तिसरा कसोटी सामना खेळताना ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. त्यामुळे तो विराट कोहलीनंतर असा दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे, ज्याने मायदेशामध्ये कारकिर्दीतील पहिल्या तीन सामन्यात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’
- “पंतने आपला नैसर्गिक खेळ खेळणे सुरुच ठेवावे, त्यात कोणताही बदल करु नये”
- “कलाकार हे ऐकाकाळी भाई लोकांच्या इशाऱ्यावर चालत होते; केंद्र सरकारने भाईगिरी कधीपासून सुरु केली”
- दुसऱ्या कसोटीसाठी १५००० प्रेक्षकांना प्रवेशाची अनुमती, ‘या’ दिवसापासून सुरु होणार तिकीट विक्री
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
