🕒 1 min read
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लॉकडाऊनमधील भरमसाठ वाढीव वीजबिलांवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केलेत. सरकारमधील वीज मंत्री आधी वीज बिल कमी करु असं म्हटले. मात्र, अदानी शरद पवार यांच्या घरी जाऊन भेटून आल्यावर सरकारने कोणतंही वीजबिल माफ करणार नाही, अशी भूमिका घेतली. सरकार वीज कंपन्यांना पाठिशी घालत आहे, असा गंभीर आरोप काल राज ठाकरे यांनी केला होता.
याच पार्श्वभूमीवर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पलटवार केला आहे. “पक्षाचा एक आमदार असलेल्या राज ठाकरेंनी केंद्र सरकारच्या विरोधातही आंदोलन करावे. राज ठाकरे यांनी विज बिल बाबत आरोप-प्रत्यारोप आणि टीका करत असतानाच, त्यांनी विरोधाची भूमिका बजावत असताना सर्वसामान्यांना जो त्रास आज पेट्रोल-डिझेल, खाण्याचे तेल आणि गॅस वाढीमुळे झालेले आहेत त्याचाही विचार करावी. त्यांनी केंद्राच्या विरोधातही आपली भूमिका मांडावी”, अशी उपरोधिक टीका राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
काल मुंबई येथे पत्रकारांशी राज ठाकरे बोलत होते यावेळी ते म्हणाले की, “सरकार इतकं निर्दयीपणे कसं वागू शकतं कळत नाहीये. मुलांच्या परीक्षांचा विचार नाही करायचा, कशाचाच विचार नाही करायचा. वीज बिल माफ होण्यासाठी वीज कंपन्यांबरोबर चर्चा कराव्या लागतील. पण या चर्चा थांबल्या आहेत. काही तरी लेणदेण झाल्याशिवाय या चर्चा थांबणार नाहीत. सरकार सर्व वीज कंपन्यांना पाठिशी घालण्याचं काम करत आहे.”
वाढीव वीजबिलांवरुन सध्या महाराष्ट्रामधील राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. यामुळे आता सर्वसामन्य लोकांचे प्रश्न सुटणार कि केवळ राजकारणच तापणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
महत्वाच्या बातम्या
- विधानसभा अध्यक्ष पदाबाबत जयंत पाटील यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
- ‘उस्मानीचे भाषण ऐकले नाही, मुळात एल्गार परिषदेला महत्व देत नाही’
- भांडवलदारांना कृषी व्यवसायात चंचूप्रवेश देण्याचा मोदींचा डाव; ‘या’ मंत्र्याचा आरोप
- शेतकरी आंदोलनावरील आंतरराष्ट्रीय प्रतिक्रियांवर पंतप्रधानांच भाष्य
- भीषण : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला उत्तराखंड दुर्घटनेचा आढावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
