अकोला : विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे पटोले यांनी राजीनामा सोपवल्यानंतर आता झिरवळ यांच्याकडेच हंगामी अध्यक्षपद असणार आहे. यामुळे आता अध्यक्षपद हे कोणत्या पक्षाकडे जाणार हे महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेकडे देऊन कॉंग्रेस आपल्या पदरात आणखी एक मंत्रिपद पाडून घेण्याच्या विचारात आहे.
मात्र, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आता नवीन विधानसभा अध्यक्ष ठरवण्यासाठी पुन्हा चर्चा होणार. अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं ते आता खुलं झाले आहे.’ असं म्हणत त्यांनी आता विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस देखील उत्सुक असल्याचे संकेत पवारांनी दिल्यावर महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवारांच्या सुरात सूर मिसळले आहेत. कॉंग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविल्याने नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, कॉंग्रेस हे तीनही पक्ष एकत्र चर्चा करून निर्णय घेतील, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पियुष गोयल शेतीतज्ज्ञ आहेत हे कळाल्याने माझ्या ज्ञानात भर पडली : शरद पवार
- ‘उस्मानीचे भाषण ऐकले नाही, मुळात एल्गार परिषदेला महत्व देत नाही’
- भांडवलदारांना कृषी व्यवसायात चंचूप्रवेश देण्याचा मोदींचा डाव; ‘या’ मंत्र्याचा आरोप
- शेतकरी आंदोलनावरील आंतरराष्ट्रीय प्रतिक्रियांवर पंतप्रधानांच भाष्य
- भीषण : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला उत्तराखंड दुर्घटनेचा आढावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
