पुणे : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज (7 फेब्रुवारी) पुण्यातर गरीब मराठा समाज संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. मराठा आरक्षणाबाबत सुरु असलेल्या खटल्यावरुनही फटकेबाजी केली.
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या आंदोलनावर देखील भाष्य केले आहे. दिल्लीतील शेतजाऱ्यांचं आंदोलन वस्तुस्थितीला धरून आहे’, अस ते म्हणाले. ‘कृषी हा विषय राज्याचाही आहे. काँट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा करण्यापासून राष्ट्रवादी, काँग्रेसला आम्ही थांबू शकलो नाही. मला काही लोकांनी दिल्लीत का जात नाही म्हणून विचारलं, पण माझा लढा राज्यात आहे. राज्यात लढा पूर्ण होत नाही, तोपर्यंत दिल्लीत जाणार नाही’, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अख्खा मेंदू महाराष्ट्रात आहे’, असा घणाघात आंबेडकरांनी केला आहे.
‘महाराष्ट्रातील कायदा रद्द झाला तर देशातील कायदा आपोआप रद्द होतो. कायदा राज्यावर अवलंबून केला जातो. नंतर केंद्राला अधिकार येत नाही. तीन पायाचे सरकारला हा कायदा रद्द करण्याची काय अडचण येते? हे कळत नाही. जमिनी वाचवायच्या असतील, ‘कॉन्ट्रॅक्ट फार्मिंम’चा कायदा रद्द करायची गरज आहे. कोर्टात जाण्याच्या विषयच शिल्लक राहत नाही. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंम आणि शेती मालकांचा नेमका काय विषय हे जाहीर करायला हवं. पुन्हा सावकारकी सुरू होतील, आणि जमिनी जातील. एकदा हे झालं तर शेतकऱ्यांच्या हातात काहीही शिल्लक राहणार नाही”, असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
- पियुष गोयल शेतीतज्ज्ञ आहेत हे कळाल्याने माझ्या ज्ञानात भर पडली : शरद पवार
- ‘उस्मानीचे भाषण ऐकले नाही, मुळात एल्गार परिषदेला महत्व देत नाही’
- भांडवलदारांना कृषी व्यवसायात चंचूप्रवेश देण्याचा मोदींचा डाव; ‘या’ मंत्र्याचा आरोप
- शेतकरी आंदोलनावरील आंतरराष्ट्रीय प्रतिक्रियांवर पंतप्रधानांच भाष्य
- भीषण : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला उत्तराखंड दुर्घटनेचा आढावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
